शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यातील रेशनिंगचा काळाबाजार उघड, गुन्हे अन्वेषणचा छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:10 IST

या छाप्यामध्ये रेशनिगच्या काळाबाजारातील धान्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देटेम्पो आणि धान्यासह १२ लाख ७१ हजार ३८० चा माल जप्तएकास अटक ,तिघेजण फरारी 

बारामती : बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार उघडकीस आला आहे. या छाप्यामध्ये रेशनिगच्या काळाबाजारातील धान्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेशनिंगचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत ६ लाखांचा टेम्पो आणि धान्यासह १२ लाख ७१ हजार ३८० चा माल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकास अटक करण्यात आली आहे.इतर तिघे जण फरारी झाले आहेत.  बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस जवान संदीप जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरची कारवाई करण्यात आली आहे. वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार उघडकीस आला आहे.रेशनिंगचा गहू व तांदूळ रेशन दुकानदाराकडून घेऊन त्याची सरकारी पोती बदलली जात असत.तसेच,ते धान्या दुसऱ्या नवीन पोत्यात भरून त्याची विक्री करण्याचे नियोजन केले जात असे.त्यासाठी काळाबाजारातील धान्य खरेदी करुन त्याचा साठा केला जात असे.काळ्या बाजारातील माल रूममध्ये भरलेला तसेच आयशर टेम्पोमध्ये भरलेला माल मिळून आला आहे.सौरभ सुधीर शहा,सुधीर जवाहरलाल शहा,अक्षय मुथा,जाफर शेख अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. यांपैकी सौरभ यास अटक करण्यात आली आहे.इतर तिघेजण फरारी झाली आहेत.यावेळी केलेल्या  कारवाईत ६ लाखाचा टेम्पो आणि धान्यासह १२ लाख ७१ हजार ३८० चा माल जप्त करण्यात आला आहे.यामध्ये ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा  १५ टन गहु, २ लाख ७० हजार रुपये किंमतीचा १३ टन ५९९ किलो तांदुळ, ८ हजार ७५० रुपये किंमतीची २५०  किलो साखर, ४७ हजार ६३० रुपये रोख, ६ लाख रुपये किंंमतीचा टेम्पो,११६  पांढरे रंगाचे सरकारी प्लास्टिक पोती, ५२ खाकी रंगाचे सरकारी बारदान (पोती) जप्त करण्यात आला आहे.     पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ ,पोलीस नाईक  स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, रॉकी देवकाते तसेच,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे ,पोलीस हवालदार  बाप्पू पानसरे,पोलीस नाईक  विठ्ठल कदम  यांनी हि कारवाई  केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस