शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाद खुळा! पोलिसांनीच टाकली ED च्या कार्यालयात धाड; अधिकाऱ्यालाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 09:52 IST

ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे.

मदुरै - तामिळनाडूच्या मदुरै येथील अमंजलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीच्या एका अधिकाऱ्यास २० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. या अधिकाऱ्याने एका सरकारी डॉक्टरशी संबंधित प्रकरणात बेहिशोबी मालमत्तेचा तपास करत होता. अंकित तिवारी असं या ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने डॉक्टराकडे तब्बल १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या अटकेनंतर तामिळनाडूच्या लालचुचपत प्रतिबंधन विभागाच्या पोलिसांनी थेट मदुरै येथील ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे. आत्तापर्यंत ईडीचे अधिकारी अनेकांच्या घरी धाड टाकत होते, मात्र आता ईडीच्या कार्यालयात धाड टाकल्याने जोरदार चर्चा होत आहे.

ईडी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार प्रकरणी तपास करण्यासाठी येथील दक्षता आणि भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने विभागीय कार्यालयावर पोलिसांसह धाड टाकली. या पथकाने ईडीच्या संबंधित अधिकाऱ्याला अटक केली असून अंकित तिवारी असं त्याचं नाव आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत माहितीही पोलिसांकडून दिली जाईल. अंकित तिवारी एका वेगवाग कारमधून प्रवास करत होता, त्यावेळी, पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली. अंकित तिवारीला रंगेहाथ अटक करण्यासाठी भ्रष्ट्राचार निर्मून पथकाने जाळं टाकलं होतं. स्टेट हायवेवरील एक ड्रॉप ऑफ पाईंटवर अंकित तिवारीने संबंधित प्रकरणातील लाचेचा पहिला हफ्ता म्हणजेच २० लाख रुपये घेतले. त्याचवेळी, भ्रष्टाचार निर्मून पथकाने घटनास्थळी रेड मारली अन् ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली. तामिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ईडी अधिकाऱ्यावर अशाप्रकारे भ्रष्टाचार निर्मून पथकाच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची घटना घडली आहे.  विशेष म्हणजे तामिळनाडूतील राज्य सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणां यांच्यात ५ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याचा वाद सुरू असतानाच अशी कारवाई ईडीच्या अधिकाऱ्यावर करण्यात आली आहे. अवैध वाळू उत्खनन प्रकरणात कथित मनी लाँड्रींग प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये, मद्रास उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी नोटीसला स्थगिती दिली आहे.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचार