शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अमिषाच्या जाळ्यात अडकवणाराच सापडला पोलिसांच्या सापळ्यात; गोठवले १.३६ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 10:08 IST

वरळीत आरोपीला अटक, ओशिवरा पोलिसांनी गोठवले १.३६ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ॲमेझॉनतर्फे गिफ्ट मिळत असल्याची लिंक एका व्यक्तीला पाठवून साडेसहा लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या सायबर सेल पथकाने आरोपी रियाजउद्दीन अब्दुल सुभान अहमद (२६) याला वरळीत अटक केली. कारवाईदरम्यान या आरोपीच्या बँक खात्यातील १ कोटी ३६ लाख रुपये गोठवण्यात त्यांना यश मिळाले असून आरोपीने पाठवलेल्या टेलीग्राम लिंकचा आयपी ॲड्रेस  जपानचा असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

आरोपी अहमद हा वरळीच्या गोपाळनगरमधील गोपाळ चाळीत राहत असून, मूळचा आसामचा रहिवासी आहे. जोगेश्वरीत राहणारे इस्माईल नूरमोहम्मद शेख (३०) याला ३० जुलै रोजी अनोळखी क्रमांकावरून व्हाॅट्सॲप मेसेज प्राप्त झाला. त्यात ॲमेझॉन १५० रुपयांचे गिफ्ट देत असून नमूद लिंकवर क्लिक करायला सांगितले. गिफ्ट लागल्याच्या मोहात शेख याने लिंक क्लिक करताच वैराग सेनथील या नावाचे टेलिग्राम अकाऊंट सुरू झाले आणि १५० रुपये शेखच्या पेटीएम खात्यात जमा झाले.

  शेख जाळ्यात अडकल्याचे लक्षात घेत भामट्याने शेखला दुप्पट फायद्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. शेख भामट्याशी बोलण्यात फसले व त्याने ६ लाख ७५ हजार गमावले. 

ऑनलाइन लुटीची ‘जपान लिंक’या गुन्ह्याचा तपास परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि ओशिवरा पोलिस ठाण्याचे वपोनि मोहन पाटील, पोनि शिवाजी भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, हवालदार अशोक कोंडे, अंमलदार विक्रम सरनोबत, अनिल पाटील यांनी तपास केला. अटक आरोपीचे मोबाइल, वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, चेक बुक, पासबुक, आधार कार्ड व पॅन कार्ड जप्त करण्यात आले असून आरोपीने ऑनलाइन लुटण्यासाठी वापरलेल्या लिंकचा आयपी ॲड्रेस  जपानचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस