शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शस्त्र आणि हत्यारांची विक्री, सायबर सेलकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 17:40 IST

Cyber Cell : अशा शॉपिंग कंपनी व ऑनलाईन साईडवर बंदी आणण्याची मागणी निवेदनाद्वारे सायबर सेलकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देशहरातील समाजसेवक वकील प्रशांत चंदनशिव यांच्याकडे फेसबूकवरील काही शॉपिंग कंपनीद्वारे घातक व धारदार शस्त्रांची विक्री घरपोच करीत असल्याची माहिती काही मित्राकडून मिळाली

उल्हासनगर : फेसबुकवरील विविध शॉपिंग कंपनीद्वारे ऑनलाईन धारदार व घातक शस्त्रांची विक्री होत असल्याने गुन्हेगारीत वाढ झाल्याचा आरोप समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांनी केला. अशा शॉपिंग कंपनी व ऑनलाईन साईडवर बंदी आणण्याची मागणी निवेदनाद्वारे सायबर सेलकडे निवेदनाद्वारे केली.शहरातील समाजसेवक वकील प्रशांत चंदनशिव यांच्याकडे फेसबूकवरील काही शॉपिंग कंपनीद्वारे घातक व धारदार शस्त्रांची विक्री घरपोच करीत असल्याची माहिती काही मित्राकडून मिळाली. त्यांनी याबाबत ऑनलाईन सविस्तर माहिती काढली असता, चाकू, तलवार, गुप्ती आदी धारदार शस्त्र ऑनलाईन द्वारे मिळत असल्याची खात्री झाली. अश्या घरपोच शस्त्रामुळे सर्वत्र गुन्हेगारी वाढली असून हे देशास व समाजास घातक आहे. चंदनशिव यांनी मित्रांसह पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे धाव घेऊन ऑनलाईन शस्त्र विक्री बाबत सोमवारी माहिती दिली. अशा शस्त्रविक्री शॉपिंग कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त मोहिते यांनी झटपट कारवाई साठी सायबर सेलकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी सायबर सेलकडे कारवाई बाबत ऑनलाईन तक्रार केल्याची माहिती दिली आहे.

 फेसबुक वरील काही शॉपिंग कंपन्या ऑनलाईन शस्त्र विक्री करीत असल्याने, त्या कंपन्यावर कारवाई करून यापूर्वी विक्री केलेले घातक शस्त्र जप्त करण्याची मागणी अँड प्रशांत चंदनशिव यांनी सायबर सेलकडे निवेदनाद्वारे केली. प्रशांत चंदनशिव यांच्या या कामाचे शहरातून कौतुक होत असून पोलीस व सायबर सेलच्या करवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसadvocateवकिलulhasnagarउल्हासनगरonlineऑनलाइन