शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन कॅसिनो कम सेक्स रॅकेटवर छापा, 10 हायप्रोफाईल बारबालांसह 70 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 16:56 IST

Bar Dancer sex racket: अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पटियाला आणि लुधियानाशी संबंधित काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देखील असल्याचेदेखील सांगितले जात आहे.

पंजाबपोलिसांनी ऑर्गनाईज्ड क्राईम कंट्रोल युनिट (ओकू)ने पंजाबच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हायप्रोफाईल न्यू लाईफस्टाईल, मॅरेज पॅलेसवर छापा टाकला. यामध्ये जुगार (ऑनलाईन कॅसिनो) आणि मोठ्या शरीर विक्रय करणाऱा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. पोलिसांनी पॅलेसचा मालकासह 70 जण आणि 10 तरुणींना आपत्तीजनक परिस्थितीत अटक केली आहे. 

याचबरोबर पॅलेसमधून नऊ लाख रुपये रोख, स्नोकर, दारूच्या 40 बॉटल, हुक्का, जुगाराचे साहित्य आणि 10 मोबाईल फोनसह 47 वाहने जप्त केली आहेत. ओकूच्या 30 लोकांच्या टीमने हा छापा मारला. एसपी जसकीरत सिंह यांनी सांगितले की, येथे महागडी दारू दिली जात होती. जुगार खेळला जात होता. 100 मोबाईल जप्त करण्यात आले होते. या अड्ड्यातून मिळणारा पैसा गँगस्टरांना पुरविला जात होता. पंजाबचे सर्वात मोठे रॅकेट होते. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पटियाला आणि लुधियानाशी संबंधित काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देखील असल्याचेदेखील सांगितले जात आहे. रॅकेट चालविणारा परमजीत सिंह पम्मीलादेखील अटक करण्यात आली आहे. राजपुराचे डीएसपी गुरुंदर सिंह आणि एसएचओ सिटी गुरप्रताप सिंह हे देखील छापा टाकताना होते. पम्मी हा या भागातील मोठा असामी आहे. राजकारण्यांमध्ये वजन असल्याने तो हा धंदा करत होता. हे सेक्स रॅकेट आणि काळे धंदे आठवड्यातून तीन दिवस सुरु असायचे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हा धंदा सुरु असायचा. हा पॅलेस एखाद्या क्लबसारखाच होता. तीन दिवसांची फी 25000 रुपये होती. यामध्ये जेवण, दारू, कोल्ड्रींक आदी दिले जात होते. अन्य खर्च वेगळा घेतला जात होता. आरोपींविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. 

बार डान्सर...ऑनलाईन कॅसिनोमध्ये पैसे लावायचे आणि त्याच्या आजुबाजुला बार डान्सर नाच करायच्या. यामुळे या पॅलेसमध्ये मोठी गर्दी होत होती. तसेच देहव्यापारही चालू होता. दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तींना मुली पुरविल्या जात होत्या. आज या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.  

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटsex crimeसेक्स गुन्हाPunjabपंजाबPoliceपोलिस