शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एक चोर अन् 25 कोटींची चोरी; एकट्यानेच रचला प्लॅन, पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 21:01 IST

दिल्लीतील सोन्याच्या दुकानातून 25 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील एका सोन्याच्या दुकानात झालेल्या 25 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणीपोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एवढ्या मोठ्या चोरीचा कट एकाच व्यक्तीने रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने दुकानाची रेकी केली आणि नंतर 25 कोटींचे दागिने घेऊन बिलासपूरला गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश श्रीवास असे या चोरट्याचे नाव आहे. तो आधी एकटा बसने दिल्लीला आला आणि रविवारी 24 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता शेजारील इमारतीतून ज्वेलरी शोरुममध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 7 वाजता त्याच मार्गाने बाहेर पडला.

एकाच चोरट्याने 25 कोटींची चोरी केली यानंतर लोकेश रात्री 8.40 वाजता दिल्लीतील कश्मिरे गेट बसस्थानकावर आणि बसने गावी गेला. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर लोकेशचा सुगावा लागला. 

छत्तीसगडमधून तीन आरोपींना अटकचोरीकेल्यानंतर लोकेश छत्तीसगडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिल्ली पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांना माहिती दिली. छत्तीसगड पोलिसांनी मुख्य आरोपी लोकेश श्रीवास याला दुर्ग येथील स्मृतीनगर पोलीस स्टेशन परिसरातून अटक केली. लोकेशशिवाय शिवा चंद्रवंशी याच्यासह तिघांना अटक करण्यात आली. 

18 किलो सोने आणि 12.50 लाखांची रोकड जप्त पोलिसांनी आरोपीच्या अड्ड्यावर छापा टाकला तेव्हा पोलिसही चक्रावले. आरोपींनी बेडवर सोने आणि पैसे ठेवले होते. त्यांच्याकडून दिल्लीतील शोरुममधून चोरलेले 18 किलो सोने आणि 12.50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी लोकेशचा दुसरा सहकारी शिवा चंद्रवंशी याला कावर्धा येथून दागिन्यांसह 28 लाख रुपयांच्या मालासह अटक केली आहे. पोलीस आरोपींना अटक करून दिल्लीत आणत आहेत.

टॅग्स :Robberyचोरीdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस