शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा भाऊ बनून तिच्या पतीची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 11:18 IST

Crime News : पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि इशारा देऊन सोडलं. चौकशी दरम्यान समजलं की, तरूण महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता.

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक प्रियकर प्रेयसीचा भाऊ बनून तिच्या पतीविरोधात तक्रार करण्यासाठी एसपीकडे पोहोचला. पती तिला मारहाण करत असल्याची तक्रार त्याने केली. पोलिसांनी या तरूणावर संशय आला. त्यानंतर त्यांनी चौकशी केली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि इशारा देऊन सोडलं. चौकशी दरम्यान समजलं की, तरूण महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  प्रेयसीचं लग्न जुळवण्यातही याच तरूणाचा हात होता. पण आता जेव्हा त्याचं काम होत नाहीये तेव्हा तो तिचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. एसपी कौस्तुभ कुमार यांनी कथित प्रियकराला सांगितलं की, जर त्याने पुन्हा विवाहित महिलेच्या आयुष्यात लुडबूड केली तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल.

ही घटना गुरूवारची आहे. आरोप आहे की, तरूण त्याची अर्ज घेऊन एसपीसमोर आला होता आणि त्याने सांगितलं होतं की, सासरी त्याच्या बहिणीवर अत्याचार होत आहेत. त्याच्या बहिणीला सासरचे लोक मारहाण करत आहेत. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. एसपी डॉ. कौस्तुभ यांनी गंभीरतेने याची चौकशी सुरू केली. यानंतर तरूणाने हॉस्पिटलमध्ये भरती महिलेसोबत त्याचं नातं कधी चुलत बहीण तर कधी भाची असं सांगितलं. यावर पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं. या घटनेबाबत महिलेच्या पतीला सांगण्यात आलं तेव्हा तो ढसाढसा रडायला लागला होता. पती म्हणाला की, या तरूणानेच त्याचं लग्न जुळवलं होतं. आता आमच्या संसारात लुडबूड करत आहे. त्याने मला बदनाम केलं. लोक चर्चा करत आहेत की, माझ्या पत्नीचे दोन-दोन पती आहेत. मी अडकलो आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी