शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी गोळीबार करणारा जेरबंद ; खडकवासला येथील गोळीबार प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 19:15 IST

मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार होता केला.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

पुणे : खंडणासाठी खडकवासला येथे एकावर गोळीबार करणार्‍यांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल . ही घटना रविवारी रात्री खडकवासला परिसरात घडली होती. उदय उर्फ विक्या महेंद्र सोनवणे (वय २०, रा. किरकटवाडी)  अटक केलेल्याचे नाव आहे.गोळीबारात विजय उर्फ खंडू लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा. रायकर मळा, धायरी) जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू सोनवणे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सोनवणे यांचा इलेक्ट्रिक साहित्यनिर्मितीचा व्यवसाय आहे. ते खडकवासला परिसरातील लांडगे वस्ती येथे राहायला आहेत. सोनवणे यांच्याकडे चेतन लिमन याने ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. विजय चव्हाण यांचा खडकवासला चौपाटीवर हातगाडी असून ते इतरवेळी राजू सोनवणेकडे कामाला असतात.रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास विजय चव्हाण त्यांच्याकडे आले होते.ते घराबाहेर बोलत थांबले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात गोळीबारात राजू ऐवजी विजय गंभीर जखमी झाले होते.त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीने पथक तयार करुन हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. हल्लेखोर उदय सोनवणे हा नांदेड फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याची कबुली दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, दत्तात्रय जगताप, विजय कांचन, दत्तात्रय तांबे, गुरु जाधव, अमोल शेंडगे, एम. एस. भगत, धीरज जाधव यांच्या पथकाने केली.चेतन लिमन याच्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार व २ वर्षांपासून फरार असलेला अदित्य बाळकृष्ण गायकवाड (वय २१, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड)याला पकडून हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेFiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक