परभणीत अज्ञात वस्तूच्या स्फोटात एकजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:44 IST2018-07-19T13:43:05+5:302018-07-19T13:44:51+5:30
शहरातील नंदखेडा रस्त्यावर आज सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास अज्ञात वस्तूचा स्फोट झाला.

परभणीत अज्ञात वस्तूच्या स्फोटात एकजण जखमी
परभणी : शहरातील नंदखेडा रस्त्यावर आज सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास अज्ञात वस्तूचा स्फोट झाला. यात एकजण जखमी झाले आहे.
दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच पोलिसांनीसुद्धा श्वानपथकाच्या सहाय्याने तपास सुरु केला आहे. या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकायला आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.