शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पॅरोलवर सुटल्यानंतर चार वर्षे फरार आरोपीस अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:23 IST

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर तब्बल चार वर्षे फरार असलेला आरोपी रमेश नामदेव नाईकवाडे (३८) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे युनिट एकच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला येथून शनिवारी सकाळी अटक केली.

ठाणे : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर तब्बल चार वर्षे फरार असलेला आरोपी रमेश नामदेव नाईकवाडे (३८) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे युनिट एकच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला येथून शनिवारी सकाळी अटक केली. तसेच त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलिसांनी दिली.नाशिक ग्रामीण क्षेत्रातील येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत खून आणि अनुसूचित जातीजमाती कायदा कलम ३ प्रमाणे १७ मे २०१३ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आरोपी रमेश नामदेव नाईकवाडे, रा.पाटोदा, ता. येवला, जि. नाशिक हा नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत होता.तो २७ जून २०१५ रोजी अभिवचन रजेवर आला असता, तो ती भोगून हजर होणे आवश्यक असताना २६ सप्टेंबर २०१५ रोजी पासून फरार झाला होता. तो फरार झाल्याबाबत त्याच्याविरु द्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा घटक १ ठाणेचे पोलीस नाईक किशोर भामरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रमेश याला १० आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजता त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.आरोपीस केले नाशिक पोलिसांच्या हवालीअटक केलेल्या आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस हवालदार आनंद भिलारे, सुभाष मोरे, शिवाजी गायकवाड, पोलीस नाईक किशोर भामरे, दादासाहेब पाटील, पोलीस शिपाई राहुल पवार या पथकाने केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी