शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एक रात्र... गेले ३३ लाख फक्त! कंत्राटदार अडकला कॉल गर्लच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 06:38 IST

मैत्रिणीला सांगताच प्रकरण उघड...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मैत्रिणीच्या संपर्कातून कॉल गर्लच्या जाळ्यात अडकलेल्या एका ४१ वर्षीय कंत्राटदाराला एका रात्रीसाठी ३३  लाख ५५ हजार रुपये गमावण्याची वेळ ओढवली आहे. कॉल गर्लने पतीच्या मदतीने दोघांच्या संबंधाचे व्हिडीओ कुटुंबीयांना शेअर करण्याबरोबर बलात्काराची खोटी तक्रार करण्याची भीती घालून पैसे उकळले. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खोपोलीचे रहिवासी असलेले ४१ वर्षीय तक्रारदार रस्ते बांधकामाचे कंत्राटदार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये मैत्रिणीशी गप्पा सुरू असताना तिच्या फोनवरून काजल महतो नावाच्या तरुणीशी त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर, काजलचे फोन सुरू झाले. काही दिवसांनी तिने आपण कॉल गर्ल म्हणून काम करत असून एका रात्रीचे २० हजार रुपये घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार, कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर त्यांची भेट झाली. तिच्यासोबत एक रात्रही तक्रारदाराने घालवली. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या. दरम्यानच्या काळात काजलने तक्रारदाराच्या मोबाइलमधील सर्व संपर्क क्रमांक काढून घेतले. पुढे मधाळ जाळ्यात ओढून त्याच्याकडून टीव्ही घेतला.  आणखीन मागणी वाढताच तक्रारदाराने तिला नकार दिला. 

मैत्रिणीला सांगताच प्रकरण उघड...

  • दोघे फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच संबंधिताने घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगितला. 
  • तिने महतो दाम्पत्याला पैसे परत करण्याची मागणी केली. त्यांनी कॉल घेणे बंद केले. अखेर, पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 
  • कुर्ला पोलिसांनी दोघांविरोधात फसवणूक, खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. अधिक तपास सुरू आहे.
  • नकार ऐकताच दोघांच्या संबंधाचे व्हिडीओ पत्नी व नातेवाइकांना पाठवण्याची धमकी काजलने दिली. घाबरलेल्या कंत्राटदाराने ५ ऑगस्ट रोजी तिला ७५ हजार रुपये दिले. पुढे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर ३० लाख ५० हजार रुपये काजलने उकळले. तिने आणखी १० लाखांची मागणी केली. त्यांनी फोन घेणे बंद केले. त्यानंतर काजलचा पती हरिशंकरने कॉल करून माझ्या पत्नीवर बलात्कार केला म्हणून १० लाख रुपयेे दे, अशी धमकी दिली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई