शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

टिप्परखाली दबल्याने एकाचा मृत्यू, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 6:12 PM

Accident : हिंगणा -दादगाव रोडवरील रात्रीची घटना : टिप्परमध्ये अवैध रेती

ठळक मुद्देही घटना १३ जूनच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली.नांदुरा पावसाळ्यात पूर्णा नदीला पूर येत असल्याने नदीपात्रातील रेतीचे उत्खनन थांबते.

नांदुरा (बुलडाणा) : अवैधपणे रेती चोरून नेणारे टिप्पर हिंगणा ते दादगाव दरम्यान उलटल्याने त्याखाली मलकापूरमधील चार मजूर दबले. दबलेल्या मजुरांना जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. त्यापैकी तीन गंभीर जखमी झाले. एका मजुराला पुढील उपचारासाठी अकोल्याला नेत असल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १३ जूनच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली.

पूर्णा नदी तीरावरील हिंगणा, भोटा, येरळी, रोटी, बेलाड, गौलखेड या गावांमध्ये पूर्णा नदीपात्रातील रेती सरकारी जागेवर आणून हजारो ब्रास रेतीचे शेकडो साठे तयार केले आहेत. त्या साठ्यातून अवैध रेती वाहतूक करताना टिप्पर क्रमांक एमएच-२१ एक्स-४४२१ चा चालक दशरथ ठाकरे याने भरधाव वाहन चालवले. टिप्पर हिंगणा ते दादगाव दरम्यान उलटले. त्यावेळी मजूर सलमान खान अयुब खान (वय २१), भिकनशाह रहिमशाह (वय २१), सोहिल शाह मुनाब शाह (वय १९), समीर शाह हईम शाह (वय १८) हे सर्व टिप्परखाली दबले. याबाबतची माहिती रात्रीच्या वेळी लोकेशनवर असलेल्या रेती माफियांनी मिळताच त्यांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यानी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांना जेसीबीच्या साहाय्याने काढून प्रथम त्यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर खामगाव येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले. मात्र, सोहिल शाह मुनाब शाह याला अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल‍ा. या अपघात याप्रकरणी जलंब पोलिसांनी चालक दशरथ ठाकरे रा. वाघूड तालुका मलकापूर याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद केली. या अपघाताची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश पाऊलझगडे, विनल मिरगे, ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, प्रवीण डवंगे, आनंद वावगे, अमोल घोराडे यांनी तात्काळ जेसीबी बोलावून मजुरांना बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ हलविले .

- पूर्णा तीरावर हजारो ब्रासचे शेकडो साठेनांदुरा पावसाळ्यात पूर्णा नदीला पूर येत असल्याने नदीपात्रातील रेतीचे उत्खनन थांबते. त्यामुळे पूर्णा कुशीतील काही छोटे रेती माफिया तीरावरील गावांमध्ये मे महिन्यातच शासकीय जागेवर रेती साठे करतात. नांदुरा व जळगाव तालुक्यातील गावांमध्ये हजारो ब्रासचे शेकडो रेतीसाठे शासकीय जमिनीवर आहेत. याची माहिती महसूल विभागाला आहे, असा दावा रेती माफिया करतात. त्यामधील रेती रात्रीच्या वेळी नांदुरा, जळगाव व मलकापूर येथील मोठ्या रेतीमाफियांना विकतात. त्यातूनच हा अपघात घडला आहे.

- महिनाभरापूर्वी दबला होता मजूररेतीमाफियांचे नंदनवन बनलेल्या याच परिसरात महिनाभरापूर्वी रेतीखाली दबलेल्या मजुराला जिवंतपणे बाहेर काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे हा धंदा या परिसरात आता चांगलाच फोफावला आहे. त्यामध्ये होणारे अपघात निष्पाप मजुरांचा जिवावर बेतत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यूAccidentअपघात