शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन बोटे छाटली, महिला सहाय्यक आयुक्त पिंपळेंवर फेरीवाल्याचा जीवघेणा चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 23:35 IST

Crime News : पिंपळे यांची दोन तर बचाव करणाऱ्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले, फेरीवाला पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्दे संतप्त झालेल्या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला.  घटनेत हल्ला करणाऱ्या  अमरजीत यादव याला पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली आहे.

ठाणे  : कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत. तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकावर देखील हल्ला झाला असून त्याचे देखील एक बोट कापले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर आता येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणी हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी सांयकाळी ६.३० च्या सुमारास घडली.

 घटनेत हल्ला करणाऱ्या  अमरजीत यादव याला पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली आहे. ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील अनाधिकृत बांधकामांपाठोपाठ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार मागील आठवडय़ापासून ही कारवाई सुरु आहे. सोमवारी अशाच प्रकारे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणा:या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. सांयकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरु होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतानाच संतप्त झालेल्या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला.

फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता, त्याच वेळेस हल्यापासून बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्याहाताची दोन बोटे कापली गेली ती तुटुन खाली पडली. तर या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले गेले. तर यावेळी येथील स्थानिक नागरीक आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्या फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे समजताच त्याने तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळ चालणाऱ्या या थरारनाटय़ानंतर अमरजीत यादव या फेरीवाल्याला मोठय़ा शिताफीने पकडून कासारवडली पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या फेरीवाल्याची गाडी जप्त केल्यानेच त्याचा राग मनात धरुन हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आता वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरार्पयत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसhawkersफेरीवालेMuncipal Corporationनगर पालिका