शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

नोकरीच्या थापा मारणारा तोतया पोलीस जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:16 IST

बनावट ओळखपत्र तयार करून पोलिसांचा ड्रेस घालून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकास हडपसर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.

हडपसर - बनावट ओळखपत्र तयार करून पोलिसांचा ड्रेस घालून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकास हडपसर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : संजय उल्हास शिंदे असे या अटक केलेल्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याचे लग्न झालेले असून तो काळेपडळ येथे राहण्यास आहे. नोकरीच्या आमिषाने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.संजय शिंदे असं नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे आणि आपल्या मोठमोठ्या कंपनीत ओळखी असल्याचे सांगत नोकरीचेआमिष दाखून त्यांच्याकडून पैसे उकळले. तसेच राहणीमान आणि पोलीस उपनिरीक्षकाचे ओळखपत्र यामुळे त्याच्यावर सहज विश्वास ठेवला जात होता. तो आपल्या कारला पोलीस अशी पाटी लावून फिरायचा तसेच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.यावेळी मात्र पोलिसांना त्याच्या गाडीच्या वर्णनाची कार लोणी टोल नाका पार करताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कार थांबवण्याचा इशारा केला. परंतु कार थांबली नाही. ती पुढे मोरेवस्तीकडे गेली. पोलिसांनी पाठलाग करून कार थांबविली. त्यावेळी कारमधील व्यक्ती आपण पीएसआय असल्याचे सांगू लागला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितले. त्याने दाखविल्यावर ते बनावट असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी ओळखले. त्यानंतर त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले.त्याचे शिक्षण १२ वीपर्यंत झालेले आहे. त्याने कोहिनूर ंइन्स्टिट्यूटमधून २०१४ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. त्याला पोलीस व्हायचे होते. परंतु पोलीस व्हायचे स्वप्न पूर्ण न झाल्याने त्याने विमाननगर येथील इनॉर्बिट मॉलमध्ये नोकरी स्वीकारली. मात्र पैशांची चणचण भासू लागल्याने लोकांना गंडविण्यास सुरुवात केली. त्याने एक पीएसआयचा गणवेश विकत घेऊन तो परिधान करत फोटो काढून बनावट ओळखपत्र तयार केले.त्यानंतर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिषाने लुटण्याची शक्कल लढविली. त्याने अशा प्रकारे पुण्यातील व पुण्याबाहेरील अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर सहा महिन्यांपूर्वी तळवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, चव्हाण, कर्मचारी राजेश नवले, बजरंग धायगुडे, अनिल कुसाळकर, अमित कांबळे, शहिद शेख, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे