शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या हवेलीत गुप्तधनाचा शोध घेताना एकाला अटक, तीन जण पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:26 IST

धामक गावात प्रशांतकुमार लूनावत यांची दीडशे वर्षांपूर्वींची जुनी हवेली आहे. येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास शेजाºयांना काही तरी खोदण्याचा  आवाज आला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर  माहिती तळेगाव दशासरचे ठाणेदार अशोक कांबळे यांना दिली.

अमरावती - दीडशे वर्षांपूर्वींच्या जुन्या हवेलीत रात्री दोनच्या सुमारास गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला. याप्रकरणी, चालक असलेल्या आरोपीस अटक केली, तर तिघे पसार झाले. तालुक्यातील धामक येथे रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली. राजेश रेखे (४५, रा. कृष्णापूर, ता. चांदूरबाजार) असे अटक आरोपीने नाव आहे. धामक गावात प्रशांतकुमार लूनावत यांची दीडशे वर्षांपूर्वींची जुनी हवेली आहे. येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास शेजाºयांना काही तरी खोदण्याचा  आवाज आला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर  माहिती तळेगाव दशासरचे ठाणेदार अशोक कांबळे यांना दिली.ठाणेदार घटनास्थळावर पोहोचेपर्यंत गुप्तधन काढण्यासाठी चालक राजेश रेखे हा पांढºया रंगाची एमएच २७ बीई २३३९ हे चारचाकी वाहन घेऊन घटनास्थळी आला. ग्रामस्थाने सदर चालकाला घेराव घातला. त्यावेळी या हवेलीत तीन जण गुप्तधन शोधत असल्याचे चालकाने पोलीस व ग्रामस्थांना सांगितले. पोलिसांनी हवेलीत प्रवेश केला असता तेथे हळदीकुंकू, कापूर, दिवा, लाल कपडा, २१ निंबू असे पूजेचे साहित्य आढळले. दोन बाय तीन असा खड्डा आरोपींनी खोदला होता.दरम्यान पोलीस आल्याची माहिती मिळताच येथील तीनही आरोपी पसार झाले. प्रकरणी जयदीप महेंद्र काकडे यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी चालक राजेश रेखे याला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता जामीन मिळाला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनात वसंत राठोड व अमोल हरमकर करीत आहे. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३ मधील कलम ३, भादंविचे कलम १८८, २६९, ३४ व साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या ३, ४, ५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

धामक येथील एका जुन्या वाड्यात गुप्तधन शोधण्यासाठी काही लोक आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनास्थळाहून चारचाकी वाहन जप्त केले. चालकाला अटक केली.- अशोक कांबळे, ठाणेदार, तळेगाव दशासर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती