पिंपरी : देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहासमोर करण्यात आली. रोहन सहदेव पाषाणकर (वय २३, रा. नांदे, म्हाळुंगे रोड, वाघजाई रोडवर, म्हाळुंगे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाषाणकर याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाषाणकर यास ताब्यात घेत त्याच्याकडून २५ हजार ५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले. आरोपीला अटक केली असून, भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:29 IST