शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून उकळले ७० लाख, सापळा रचत आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 3:04 AM

आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सोने व्यापाऱ्याकडून ७० लाख रुपये उकळल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे.

मुंबई : आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सोने व्यापाऱ्याकडून ७० लाख रुपये उकळल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. या प्रकरणी पथकाने संतोष मिसाळला अटक केली आहे.मिसाळकडून सीबीआय अधिकारी आणि राज्य शासनाच्या मंत्र्याचे स्वीय सहायक असल्याची दोन ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सोने व्यापारी हरीसिंग राव (४१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राव यांचा मुंबईसह देशभरातील सराफांना सोने विक्रीचा व्यवसाय आहे. राव यांची हैदराबादमधील मुसद्दीलाल ज्वेलर्सचे मालक मोहनलाल गुप्ता यांच्याशी ओळख आहे. याच दरम्यान २०१६ रोजी भारत सरकारने नोटबंदी जाहीर केल्यानंतर मोहनलाल यांचा लहान भाऊ कैलास यांच्या मुलांना ईडीने अटक केली.ही माहिती राव यांनाही समजली होती. काही दिवसांनी राव यांना एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. संबंधित व्यक्तीने ईडी कारवाईत मदत हवी असल्यास एक जण असल्याचे सांगितले. त्यानुसार, रावने मोहनलाल यांचा मोबाइल क्रमांक संबंधित व्यक्तीला दिला. काही दिवसांनी राव हैदराबादला गेल्यानंतर, संबंधित कॉलधारकाने भावाच्या मुलांची सुटका करून देण्यासाठी ५ किलो सोने देण्याचे ठरल्याचे राव यांना सांगितले. राव यांनी परस्पर निर्णय घ्या, असे सांगत ते निघून गेले.काही दिवसांनी संबंधित कॉलधारकाने काम केले नसून सोने घेऊन गेला असल्याचे सांगताच राव यांना धक्का बसला. मोहनलालने राव यांना ते सोने परत करण्याची विनंती केली. मात्र संबंधित कॉलधारक ओळखीचा नसल्याचे सांगून राव यांनी फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा फोन येणे सुरू केले. याच दरम्यान मिसाळने आयपीएस अधिकारी संदीपकुमार मीना बोलत असल्याचे सांगून, मोहनलाल यांचे ५ किलो सोने परत करा; अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी भीती घातली. संबंधित व्यक्ती आयपीएस अधिकारी असल्याचे समजून राव यांनी तडजोडीअंती ७० लाख रुपये देण्यास तयारी दर्शवली. मात्र त्यापूर्वी त्यांनी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागात धाव घेतली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून मिसाळला बेड्या ठोकल्या. चौकशीत तो अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, त्याला सोमवारी या गुन्ह्यांत अटक करीत त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई