अमरावती शहरातील चेन स्नॅचिंगच्या सलग तीन घटनेनंतर एका आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2024 19:07 IST2024-03-04T19:07:20+5:302024-03-04T19:07:28+5:30
अमरावती शहरातील 20 फेब्रुवारीला फेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंगची घटना घडली होती.

अमरावती शहरातील चेन स्नॅचिंगच्या सलग तीन घटनेनंतर एका आरोपीला अटक
अमरावती शहरातील चेन स्नॅचिंगच्या सलग तीन घटनांनंतर पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात यश आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर अन्य एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अमरावती शहरातील 20 फेब्रुवारीला फेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. यासह नांदगाव पेठ आणि राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील आणखी दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी दोन आरोपींचा शोध लावला आहे. रौनक किशोर राठोड (19) आणि गब्बर शहा वल्द माजीद शहा (29) असे त्या दोन आरोपींचे नाव असून दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी आहेत. यापैकी आरोपी रौनक राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. तर गुन्ह्यात वापरलेली बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. अन्य एक आरोपी गब्बर शहा हा सराईत गुन्हेगार असून तो फरार आहे. चैन स्नॅचिंगमधील चोरीचे सोने त्याच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.