शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साताऱ्यात भावाकडून बहिणीला मारहाण

By दत्ता यादव | Updated: October 25, 2022 21:30 IST

मोटारसायकल न दिल्याचा राग, गाडीचीही केली तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी क्षुल्लक कारणातून भावाने बहिणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील जानकर काॅलनीमध्ये घडली. याप्रकरणी भावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन शिवाजी खरात  (रा. जानकर काॅलनी, मंगळवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या भावाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुजा नवनाथ जरग (वय २३, रा. जानकर काॅलनी, मंगळवार पेठ, सातारा) ही विवाहित असून, तिचा भाऊ नितीन खरात हा त्याच काॅलनीत राहतो. लक्ष्मीपूजनदिवशी सायंकाळी नितीनने बहिणीला मोटार सायकल मागितली. परंतु बहीण पूजा हिने मोटारसायकल देण्यास नकार दिला. यामुळे चिडून जाऊन नितीनने लाकडी दांडक्याने बहिणीच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच यावेळी त्याने बहिणीला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याने लक्ष्मीपूजनासाठी घराबाहेर उभ्या केलेल्या दोन दुचाकीचीही लाकडी दांडक्याने तोडफोड करून नुकसान केले. या प्रकारानंतर बहिणीने भावाच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नितीन खरातवर गुन्हा दाखल केला.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर