शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

वृध्दाला उडवून झाला होता पसार; बाइक स्टंटमॅनला अवघ्या दोन तासांमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:18 IST

ठाणे - वृद्धाला उडवून पसार झालेल्या तरूणाला पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केल्याची घटना रविवारी घडली. त्याची मोटारसायकल जप्त केल्याचे ...

ठळक मुद्देवागळे इस्टेट, इटर्निटी मॉलच्या बसस्टॉपसमोरील रस्त्यावरून धर्मा शिर्के (६८) हे २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जात होते.मोटारसायकलच्या धडकेमुळे शिर्के हे गंभीर जखमी झाल्याचे आढळले.अपघाताचा कोणताही सुगावा नसताना नवीन तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये सावंतला जेरबंद केले.

ठाणे - वृद्धाला उडवून पसार झालेल्या तरूणाला पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केल्याची घटना रविवारी घडली. त्याची मोटारसायकल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.वागळे इस्टेट, इटर्निटी मॉलच्या बसस्टॉपसमोरील रस्त्यावरून धर्मा शिर्के (६८) हे २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांना तनुज सावंत (२०, रा. नौपाडा, ठाणे) या स्टंटबाज मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक देऊन पलायन केले होते. त्याचवेळी तिथे गर्दी झाल्यामुळे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने तिथे चौकशी केली. तेव्हा, मोटारसायकलच्या धडकेमुळे शिर्के हे गंभीर जखमी झाल्याचे आढळले. त्यांच्या दोन्ही पायांची हाडे तुटल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने आधी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात, नंतर कळवा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची गांभीर्यता पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोटे यांच्या पथकाने वागळे इस्टेट परिसरात स्टंटबाजी करत मोटारसायकल चालवणाऱ्यांची माहिती घेतली.सोशल मिडियाच्या आधाराने अनेकांची चौकशी केली. सखोल चौकशीअंती वागळे इस्टेट धर्मवीरनगर येथील मोटारसायकलस्वाराने यातील स्टंट करणाºया तरुणाला ओळखले. त्यानुसार, नौपाड्यातील जयानंद सोसायटीतून तनुज सावंत याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने हा अपघात आपणाकडून झाला असून त्यानंतर आपण पलायन केल्याचीही कबुली दिली. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. अपघाताचा कोणताही सुगावा नसताना नवीन तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये सावंतला जेरबंद केले.

सोशल मीडियावर फोटो करायचा अपलोड

तनुजला वेगवेगळ्या मोटारसायकलवर स्टंटबाजी करण्याची सवय आहे. स्टंटबाजी करताना फोटो काढून तो फेसबुकवर टाकायचा. त्याचे असेच काही फोटो तपास पथकाच्या हाती लागले. मोटारसायकली मात्र वेगवेगळ्या होत्या. याच फोटोंच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Stuntmanस्टंटमॅनPoliceपोलिसArrestअटक