शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! राहत्या घरात वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 19:32 IST

बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय 

ठळक मुद्दे तिथे राहणाऱ्या चंद्रकला भय्ये (6-क) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. शिवाय त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याने संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नवी मुंबई - धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात वृध्देच्या हत्येची घटना सोमवारी सकाळी घणसोलीत घडली आहे. पहाटेच्या सुमारास पती कामानिमित्ताने घराबाहेर गेले असता हा प्रकार घडला आहे. मात्र,या घटनेनंतर त्याच इमारतीमध्ये राहणारा मृत महिलेचा मुलगा बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त होत आहे.घणसोली येथील घरोंदा वसाहतीमधील सिध्दीविनायक सोसायटीच्या ए/13 क्रमांकाच्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथे राहणाऱ्या चंद्रकला भय्ये (6-क) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. पती यशवंत भय्ये यांच्यासह त्या तिथे रहायच्या. तर त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा शेखर हा पत्नी व लहान मुलासह रहायला आहे. सोमवारी सकाळी तो दुध आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. परंतु बराच वेळ होवूनही तो परत न आल्याने त्याची खालच्या मजल्यावरील सासू - सासऱ्यांच्या घरी आली. परंतु दरवाजा ठोकूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी सासरे यशवंत यांना फोन करुन कळवले. यानुसार ते काही वेळात घरी आले असता स्वत:कडील चावीने त्यांनी दरवाजा उघडला. यावेळी घरात हॉलमध्ये चंद्रकला ह्या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या असल्याचे आढळून आले. धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या चौकशीत मृत वृध्द महिला चंद्रकला यांचा मुलगा शेखर हा सकाळपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. यामुळे पोलीसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो स्वतच्या हातांकडे निरखून पाहत सोसायटीमधून बाहेर जाताना दिसून येत आहे. शिवाय त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याने संशय व्यक्त होत आहे. परंतु हत्येमागील कारण देखिल अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई