शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात झाडलोट करायला बाहेर आलेल्या आजी समोरच्या दृश्याने हादरल्या; रक्ताच्या थारोळ्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:56 IST

Pune Crime: आदल्या रात्री घरासमोरील पलंगावर झोपलेल्या माणसाबाबत घडली धक्कादायक घटना

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क: झाडलोट करण्यासाठी आजी पहाटे पहाटे घराबाहेर पडली होती. मात्र समोरचे दृश्य पाहून आजीला दरदरून घाम फुटला. कारण घराशेजारीच राहणारा एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कुणीतरी भला मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला होता. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. खुनाचा हा प्रकार घडला लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

रवींद्र काशिनाथ काळभोर (वय ४५ रा. वडाळी वस्ती, रायवाडी रोड, टाक्याचा माळ,  सिद्धनाथ मंदिराजवळ लोणी काळभोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री दहा वाजता घरासमोर पलंगावर झोपले होते. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास शेजारीच राहणारी आजी झाडलोट करण्यासाठी उठली. अंगणात बांधलेली गाय सोडण्यासाठी त्यांनी रवींद्र काळभोर यांना उठवण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र समोरचे दृश्य पाहून त्या प्रचंड हादरल्या. कारण रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात पालथे पडले होते. आणि त्यांच्या शेजारीच भला मोठा दगड पडला होता. त्यांनी घरातील इतरांना याची माहिती दिली. 

दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जात आहे. मात्र रवींद्र काळभोर यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समोर आलं नाही. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPuneपुणेPoliceपोलिस