शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याने फेसबुक आयडी केला हॅक; पत्नीने दाखल केला FIR, जाणून घ्या काय आहेत नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 21:41 IST

Facebook ID hacked : पत्नीला हा प्रकार कळताच तिने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात येथील वनविभागात पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने त्याच्याच पत्नीचा फेसबुक आयडी हॅक केला. त्याचवेळी पत्नीला हा प्रकार कळताच तिने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.काय प्रकरण आहे?खरे तर वनविभागात तैनात असलेले एसडीओ ओमप्रकाश बिडारे यांच्यावर पत्नीचा फेसबुक आयडी हॅक केल्याचा आरोप आहे. हा प्रकार पत्नीला समजल्यानंतर तिने पतीविरुद्ध इंदूरमधील भंवरकुआन पोलिस ठाण्यात आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या जोडप्याचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. सध्या या अधिकाऱ्याची पत्नी इंदूरमध्ये पीएससीची तयारी करत आहे.नियम काय आहेत?तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे त्याचे धोकेही वाढले आहेत. यामुळेच तंत्रज्ञानाशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी सरकारने 2000 साली आयटी कायदा लागू केला होता. यामध्ये हॅकिंगसह सर्व सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे आयटी कायद्याच्या कलम 43 आणि कलम 66 अंतर्गत येतात. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या संगणकाचा डेटा विनापरवाना घेतला, डेटा खराब केला तर त्याला आयटी कायद्यांतर्गत तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा 5 लाख रुपयांपर्यंतचा मोठा दंड होऊ शकतो.

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइमMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस