शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मैं भी चौकीदारच्या बेकायदा जाहिरातप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:35 IST

काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरानाक्याजवळ ए.जी.नगर इमारतीच्या आवारात असलेल्या खाजगी होर्डिंगची पाहणी केली. ही जाहिरात कोणी लावण्यास दिली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मीरा रोड - मैं भी चौकीदारची भाजपाने लावलेली जाहिरात बेकायदा असल्याने भरारी पथकाने ती काढून टाकून त्याविरोधात आचारसंहिता भंग व मालमत्ता विद्रूपण कायद्यानुसार काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील अ‍ॅपवर २७ मार्च रोजी आलेली बेकायदा जाहिरातीची एका नागरिकाने केलेली तक्रार आचारसंहितेच्या भरारी पथक क्र.-२ ला मिळाली. पथकातील नोडल अधिकारी नरेंद्र चव्हाण, विशाल देवरे, किशोर घरत, कुमेश राठोड यांच्या पथकाने या तक्रारीनुसार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरानाक्याजवळ ए.जी.नगर इमारतीच्या आवारात असलेल्या खाजगी होर्डिंगची पाहणी केली.या होर्डिंगवर भाजपाची मैं भी चौकीदारची जाहिरात लावण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र, भाजपाचे निवडणूक चिन्ह, मैं भी चौकीदार कार्यक्रमात मोदींशी थेट जोडा, तसेच भ्रष्टाचार मिटाना है आदी मजकूर होता. या राजकीय जाहिरातीसाठी परवानगीच घेण्यात आली नव्हती.पथकाने त्वरित ही जाहिरात काढून घेत होर्डिंगचे मालक असलेले साई अ‍ॅडव्हर्टायझिंगचे मन्सुर मेमन, रा. कृष्णानगरी, बोरिवली (पश्चिम) विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग व मालमत्ता विद्रूपण कायद्याखाली चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही जाहिरात कोणी लावण्यास दिली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मैं भी चौकीदारची जाहिरातसुद्धा भाजपा भ्रष्टमार्गाने करत आहे. याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करावा. नागरिकांना चौकीदारचा उपदेश देणारे भाजपाचे चौकीदारच चोर आहेत, हे दाखल गुन्ह्यावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.- अंकुश मालुसरे,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :PoliceपोलिसAdvertisingजाहिरात