सव्वा किलो सोने, १.३६ कोटी रोख; अधिकाऱ्यांना घबाड सापडले, 'या' कारवाईनं विक्रम मोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:03 AM2022-03-29T10:03:31+5:302022-03-29T10:03:52+5:30

सरकारी अधिकाऱ्याच्या घरात सापडली माया; धाड टाकणारे अधिकारी पाहतच राहिले

odisha vigilance raid seizure of record cash recovery and other valuables | सव्वा किलो सोने, १.३६ कोटी रोख; अधिकाऱ्यांना घबाड सापडले, 'या' कारवाईनं विक्रम मोडले

सव्वा किलो सोने, १.३६ कोटी रोख; अधिकाऱ्यांना घबाड सापडले, 'या' कारवाईनं विक्रम मोडले

Next

भुवनेश्वर: ओदिशातील दक्षता पथकानं भ्रष्टाचाराविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. पथकानं एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. अधिकाऱ्यांच्या हाती १.३६ कोटी रुपयांची रोकड लागली. यासोबतच कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रंदेखील अधिकाऱ्यांनी जप्त केली. ती पाहून धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

मलकानगरीमध्ये वास्तव्यास असलेला सरकारी अभियंता आशीष कुमार दासला गेल्या आठवड्यात शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी दास डीसीबी बँकेच्या व्यवस्थापकाला १०.२३ लाख रुपये देण्यासाठी गेला होता. दासला ताब्यात घेतल्यानंतर दक्षता पथकानं त्याच्याकडे असलेल्या काळ्या पैशांचा शोध सुरू केला. चार दिवसांनंतर दासशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू सापडल्या. 

कारवाईत १.३६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाचे संचालक वाय. के. जेठवा यांनी दिली. ओदिशा दक्षता विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय पथकातील अधिकाऱ्यांना १.२ किलो सोनं सापडलं. दास यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या नावे ऍक्सिस बँकेत १२ खाती उघडली होती. त्यामध्ये जवळपास २.२५ कोटी रुपये आहेत. ही सगळी खाती दास स्वत: पाहायचे. यासोबतच त्यांनी एफडी, बचत खातीही उघडली होती. त्यात ४ कोटी रुपये आहेत.

दासनं त्याच्या पत्नीच्या नावे कटकमधल्या शांतीवन सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला. त्याची किंमत ३२.३० लाख रुपये आहे. पत्नीच्या नावे केओन्जर जिल्ह्यातल्या बारिपाल येथे भूखंडदेखील खरेदी केला होता. अन्य बँक खाती आणि दोन लॉकर्सच्या व्हेरिफिकेशनचं काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागांच्या विकासासाठी आलेल्या निधीवर दासनं डल्ला मारल्याची माहिती जेठवा यांनी दिली.

Web Title: odisha vigilance raid seizure of record cash recovery and other valuables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.