शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Odisha Conman: एकाच व्यक्तीच्या 27 बायका; कोणी डॉक्टर तर कोणी CA, अशी करायचा फसवणूक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:15 IST

अंमलबजावणी संचालनालयाने 10 राज्यातील 27 महिलांशी लग्न करणाऱ्या कॉनमॅनला ताब्यात घेतले आहे. जाणून घ्या त्याचे कारनामे...

Odisha Conman News: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ओडिशा राज्यातून मोठ्या कॉनमॅनला(फसवणूक करणारा) अटक केली आहे. रमेश स्वेन उर्फ ​​बिभू प्रकाश स्वेन नावाच्या या व्यक्तीचे कृत्य ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारुन घ्याल. या मास्टरमाइंडला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीवर 10 राज्यातील 27 महिलांशी लग्न करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीचा इतिहास तपासला असता आणखी धक्कादायक खुलासे झाले आहेत.

फसवणुकीचे इतर गुन्हेमुलांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने हैदराबादमधील लोकांकडून 2 कोटींहून अधिक रुपये उकळल्याप्रकरणी स्वेनला 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. एवढेच नाही तर याआधी 2006 मध्ये त्याने 128 बनावट क्रेडिट कार्डद्वारे केरळमधील 13 बँकांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणामध्येही त्याला अटक करण्यात आली.

8 महिन्यांपासून पोलिसांच्या देखरेखीखाली होताओडिशा पोलिसांचे एक पथक आठ महिन्यांपासून स्वेनवर लक्ष ठेवून होते. यानंतर पोलिसांनी त्याला 13 फेब्रुवारीला पकडले. मे 2021 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या स्वेनच्या पत्नीने पोलिसांत तक्रार देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. या महिलेने 2018 मध्ये स्वेनसोबत लग्न केले होते. पोलिसांनी सांगितले की, स्वेनने भुवनेश्वरमध्ये तीन अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. तीनही अपार्टमेंटमध्ये त्याने आपल्या तीन बायका ठेवल्या. 

सुक्षित महिलांची फसवणूकस्वेनने ITBP असिस्टंट कमांडंट, आसाममधील डॉक्टर, छत्तीसगडमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाची वकील,केरळ प्रशासकीय सेवा अधिकारी अशा मोठ-मोठ्या पदांवरील महिलांची फसवणूक केली आहे. स्वेनच्या पत्नींनी सांगितले की, तो त्यांच्याकडून पैसे उधार घ्यायचा आणि नंतर नवीन महिला शोधून तिच्याशी लग्न करायचा.

फसवणुकीत कुटुंबीयांचाही सहभाग पोलिसांनी स्वेनची पत्नी डॉ. कमला सेठी आणि तिची सावत्र बहीण आणि ड्रायव्हर यांना फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र, नंतर सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. आता ईडी 66 वर्षीय स्वेनच्या संदर्भात ओडिशा पोलिसांच्या संपर्कात आहे आणि त्याने केलेल्या फसवणुकीची चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी