शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:59 IST

अमजद आपल्या पत्नीशी गोड बोलला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर चाकू काढून तिच्यावर हल्ला केला.

ओडिशातील बालासोर शहर पोलीस हद्दीतील पठाण मोहल्ला येथे एका धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने भररस्त्यात आपल्या पत्नीचा गळा चिरला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

कटकमधील बक्षी बाजार येथील रहिवासी शेख अमजद हा आपल्या पत्नीला भेटायला आला होता. लग्नानंतर झालेल्या वादामुळे ती बालासोरमध्ये वेगळी राहत होती. दुपारी ४:३० च्या सुमारास दोघे रस्त्याच्या कडेला गप्पा मारताना दिसले. अमजद आपल्या पत्नीशी गोड बोलला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर चाकू काढून तिच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

बाल्कनीतून कोणीतरी संपूर्ण घटनेचे व्हिडीओ काढला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांनी महिलेला उपचारासाठी बालासोर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.

घटनेनंतर लगेचच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी अमजदला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोघांमध्ये खूप दिवसांपासून वाद असल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशाPoliceपोलिस