शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशी वरात घेऊन आला नाही नवरदेव, त्याच्या घरासमोर जाऊन नवरीचं ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 11:44 IST

Odisha Crime News : नवरीचा आरोप आहे की, लग्नाच्या दिवशी नवरदेव वरात घेऊन तिच्या घरी आला नाही. ज्यामुळे तिलाच त्याच्या घरी जावं लागलं. 

ओडिशातील (Odisha) बरहमपूरमध्ये एक नवरी सजून धजून आपल्या आईसोबत नवरदेवाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी पोहोचली. नवरीचा आरोप आहे की, लग्नाच्या दिवशी नवरदेव वरात घेऊन तिच्या घरी आला नाही. ज्यामुळे तिलाच त्याच्या घरी जावं लागलं. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वीच दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि दोघांच्या परिवाराने काही खास लोकांच्या उपस्थितीत पारंपारिक हिंदू रिती-रिवाजासोबत हे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

नवरीच नवरदेवाच्या घरी गेली

नवरीचा आरोप आहे की, तिच्या परिवाराने अनेक तास वरात येण्याची वाट बघितली. सोबतच नवरदेवाला अनेकदा फोन कॉल केले आणि मेसेजही पाठवले. पण त्याने ना फोन कॉलला उत्तर दिलं ना मेसेजना. त्यानंतर नवरी तिच्या आईसोबत थेट नवरदेवाच्या घरीच पोहोचली आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं.

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आई व मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोघींनी पोलिसांवरही संताप व्यक्त केला. नवरदेवाच्या परिवाराकडून लाच घेतल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर लावला.

या प्रकरणी बहरमपूर एसपी पीनाक मिश्रा म्हणाले की, महिलेचा  आरोप आहे की, तिचं लग्न सुमित नावाच्या तरूणासोबत झालं आहे. आधीही एका प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता महिलेने तरूण आणि त्याच्या परिवाराविरोधात पुन्हा तक्रार दाखल केली आहे. पोलीस म्हणाले की, चौकशी सुरू असून कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

नवरी म्हणाली की, तिने आणि सुमितने ७ सप्टेंबर २०२० ममध्य कोर्टात लग्न केलं होतं. तिच्या सासरचे लोक तिला पहिल्या दिवसापासूनच त्रास देत आहेत.  सुरूवाताली त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली. पण नंतर तो त्याच्या परिवाराच्या सांगण्यावरून वागू लागला होता. मला अनेकदा त्रास दिला आणि रूममध्ये बंद केलं. यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली होती. नंतर दोन्ही परिवारात चर्चा झाली. वाद संपला. २२ नोव्हेंबरला लग्नाची तारीख ठरली. पण ते लोक वरात घेऊन आलेच नाही. ज्यामुळे मला आईसोबत त्याच्या घरी जावं लागलं. 

 

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारी