शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ओ नगरसेवक... म्हणत चोरट्यांनी चक्क नगरसेविकेलाच लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 17:11 IST

याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस सीसीटीव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

ठळक मुद्देरविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या नगरसेविकेच्या ना कुसुम रवींद्र म्हात्रे असं आहे. कमोठे हायवेवरून म्हात्रे आणि त्याच्या सोबतच्या महिला या पायी चालत आपल्या घरी परतत होत्या.

पनवेल - कामोठे परिसरातून नगरसेविकेलाच लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या नगरसेविकेच्या ना कुसुम रवींद्र म्हात्रे असं आहे. पायी चालत घरी जात असताना म्हात्रे यांना अज्ञात इसमाने ओ नगरसेवक म्हणून हाक दिली. त्यानंतर त्या थांबल्या आणि बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या अंगावरील दागिने लुटले आणि पसार झाले. कुसुम म्हात्रे या नगरसेविका तसेच महिला बाळ कल्याण समितीच्या सभापती आहेत. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस सीसीटीव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेत आहेत. कुसुम म्हात्रे या आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या खासगी गाडीने कामोठे वसाहती जवळील महामार्गावर उतरल्या. यावेळी त्यांच्यासोबत ५ ते ७ महिला कार्यकर्त्या देखील होत्या. कमोठे हायवेवरून म्हात्रे आणि त्याच्या सोबतच्या महिला या पायी चालत आपल्या घरी परतत होत्या. दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याचे ऐवज लुटला. यावेळी वेळी म्हात्रे यांनी आरडाओरड केली. चोरटा सोन्याचे गंठण आणि सोनसाखळी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटना घडल्यानंतर नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी थेट कामोठे पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अधिक तपास कामोठे पोलीस घेत आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसChain Snatchingसोनसाखळी चोरीRobberyचोरीNavi Mumbaiनवी मुंबई