मुंबई : शिवडी क्षय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अमर पवार यांच्यावर सोमवारी तेथील परिचारिकेने विनयभंगाचा आरोप केला आहे. याबाबत आर.ए.के. मार्ग पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दिली आहे. त्यानुसार, आर.ए.के. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत. रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तक्रारदार महिलेचा समावेश आहे. रुग्णालयातील भांडणाचे पर्यावसान हे या विनयभंगाच्या पोलीस तक्रारीत होत असल्याचे रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
परिचारिकेचा डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 03:57 IST