शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Nupur Sharma Controversy: नुपुर शर्माची पोस्ट का पाहतोस..? असे म्हणत तरुणाला चाकुने भोसकले, प्रकृती नाजुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:02 IST

Nupur Sharma Controversy: बिहारच्या सीतामडी जिल्ह्यात मोबाईलवर नुपूर शर्माची पोस्ट पाहणाऱ्या तरुणावर टोळक्याने 5-6 वार केले.

Nupur Sharma Controversy: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे सुरू झालेला वाद दीड महिन्यानंतरही थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच कन्हैयालाल यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता ताजे प्रकरण बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील नानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहेरा जाहिदपूरमध्ये घडले आहे. येथे राहणारा अंकित झा त्याच्या मोबाईलवर नुपूर शर्माची पोस्ट पाहत होता, यामुळे संतापलेल्या काही विशिष्ट समाजातील मुलांनी त्याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केला. अंकितला सध्या दरभंगा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो जीवन-मरणाची झुंज देत आहे. जखमी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?जखमी युवक अंकितने रुग्णालयात प्रसारमाध्यमांना सांगितले की, शनिवारी गावापासून दूर असलेल्या नानपूर येथील एका पानाच्या दुकानात उभा राहून तो आपल्या मोबाईलमध्ये नुपूर शर्माची पोस्ट पाहत होता, तेव्हा शेजारी उभे असलेले तीन तरुण सिगारेट ओढत होते. मी माझ्या मोबाईलमध्ये नुपूर शर्माची पोस्ट पाहणे त्यांना अडवले नाही, तू नुपूर शर्माचा समर्थक आहेस का? असा सवाल त्यांनी केला. अंकितने त्यांना तुमचा काय संबंध असे सांगताच त्यांनी सिगारेटचा धूर तोंडावर फेकला व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या तरुणांपैकी एकाने चाकू काढून अंकितवर 5-6 वार केले. या घटनेत अंकित गंभीर जखमी झाला, त्याला चालू लागल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

अंकितच्या वडिलांचे आरोपदुसरीकडे, जखमी अंकितचे वडील मनोज झा यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी आपल्यावर दबाव आणून स्वत:च्या मर्जीने प्रकरण लिहून घेतले आहे. तक्रारीतून नुपूर शर्माचे प्रकरण वगळण्यात आले आहे. या घटनेनंतर आम्ही खूप घाबरलो आहोत. हल्लेखोर पुन्हा आमच्यावर हल्ला करू नयेत, यासाठी झा यांनी पोलिसांना मदतीची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस