शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सुन्न करणारी घटना; प्रियकराने पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रेयसीची मृत्यूशी झुंज संपली

By पूनम अपराज | Updated: February 9, 2021 21:55 IST

Crime News : मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. विजय खांबे असं मृत तरुणाचं नाव आहे.

ठळक मुद्देआगीत विजय ९० टक्के भाजला होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर  उपचारादरम्यान जे जे रुग्णालयात मुलीने सुद्धा आपले प्राण सोडले.

मुंबईत एक विचित्र घटना घडली आहे. प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीला पेटवून दिलं आणि पेटत्या प्रेयसीने त्याच अवस्थेत प्रियकराला मिठी मारली. यानंतर ९० टक्के भाजलेल्या प्रियकराचा मृत्यू झाला. तर जे . जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रेयसीनेही प्राण सोडले. ही सुन्न करणारी घटना जोगेश्वरी परिसरात घडली आहे. 

 

मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. विजय खांबे असं मृत तरुणाचं नाव आहे. विजयचे आपल्या मेव्हण्याच्या धाकड्या बहिणीशी गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विजयला त्याच मुलीशी लग्न करायचं होतं. यासाठी त्याने लग्नाचा प्रस्ताव सुद्धा मुलीच्या कुटुंबीयांना पाठवला होता. पण त्याचा हा प्रस्ताव मुलीच्या आई-वडिलांनी फेटाळून लावला. नंतर विजयला दारू पिण्याचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे काही दिवसांनी या मुलीनेही विजयशी लग्न करण्यास नकार दिला होता. तरीही विजय मुलीला लग्न करण्यास जबरदस्ती करत होता.  तसंच तो तिला त्रास सुद्धा देत होता. विजयच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल. रुग्णालयात आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ती घरी आली होती. यानंतर विजय पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला आणि इथे जे घडलं त्याने सगळेच हादरले.

व्हेलेंटाईन डेच्या आधीच जिवंत जाळले; पेटत्या प्रेयसीने मारली मिठी, प्रियकराचा होरपळून मृत्यू

तिला भेटायला आलेल्या विजयने आपल्यासोबत पेट्रोलची बाटली आणली होती. मुलगी घरी एकटीच असल्यामुळे विजयने संधी साधून घरात प्रवेश केला. विजय आणि मुलीमध्ये यादरम्यान पुन्हा वादंग निर्माण झाला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेली पेट्रोलची बाटली तिच्या अंगावर ओतली आणि तिला पेटवून दिलं. मुलीने आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र विजय दारात उभा राहून केवळ बघत होता. काही वेळानंतर मुलीने पळत जात विजयला मिठी मारली. विजयने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पेटत्या मुलेने त्याला काही सोडलं नाही.  दोघंही पेटलेल्या अवस्थेत घराच्याबाहेर आले आणि खाली कोसळले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन आग विझवली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केलं. आगीत विजय ९० टक्के भाजला होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर  उपचारादरम्यान जे जे रुग्णालयात मुलीने सुद्धा आपले प्राण सोडले. व्हेलेंटाईन विकमध्येच ही सुन्न करणारी घटना समोर आल्यामुळे मुंबईत खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होते आहे. 

मिठी, प्रियकराचा होरपळून मृत्यू

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेMumbaiमुंबईMurderखूनPoliceपोलिस