शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तोकडे कपडे आणि अश्लीलतेचा ‘नंगा’ नाच सुरूच! बारवर छापा, 41 जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 21:44 IST

Raid on Bar : मानपाडा हद्दीत पुन्हा एका बारवर छापा, 41 जण ताब्यात; कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई

ठळक मुद्दे बुधवारी केलेल्या या कारवाईत संबंधित 10 महिला, बार मॅनेजर आणि वेटर असे 12 जण तर 19 ग्राहक अशा 41 जणांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.

डोंबिवली:  मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बार व्यावसायिकांकडून कोरोनाचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसविले जात आहेत. सोशल डिस्टन्स पाळले जात नसताना महिलांचा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकडे कपडे घालून अश्लीलतेचा ‘नंगा’ नाच सुरूच असल्याचे पुन्हा एकदा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईतून उघड झाले आहे. शुक्रवारी मोनालिसा बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले गेले असताना पुन:श्च या हद्दीतीलच 'लोटस' या लेडीज सर्विस बारवर टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला विनामास्क होत्या तसेच तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना निदर्शनास आल्या. बुधवारी केलेल्या या कारवाईत संबंधित 10 महिला, बार मॅनेजर आणि वेटर असे 12 जण तर 19 ग्राहक अशा 41 जणांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.

हा बार डोंबिवली पुर्वेकडील कल्याण-मानपाडा रोडवर आहे. या ठिकाणी कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर चाललेल्या महिलांच्या अश्लील हावभाव आणि कृत्याची माहीती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विलास पाटील यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाली. संबंधित बार व्यावसायिकाकडे परवाना नसतानाही त्याठिकाणी लेडीज सव्र्हीस देवून ग्राहकांना आकर्षित करणोकरीता महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास लावून हावभाव करून अश्लील कृत्य करीत आहेत. त्याप्रमाणे पाटील यांच्या पथकाने संबंधित बारवर छापा टाकला असता बातमीदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणो त्याठिकाणी गैरकृत्य सुरू असल्याचे दिसून आले. तेथील महिलांच्या तोंडावर मास्क ही नव्हते तर सोशन डिस्टन्सचा फज्जा देखील उडाला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी  रोकड आणि गाणी वाजविण्याचे साहीत्य असा 24 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक मानपाडा पोलिसांचा कानाडोळा  मागील आठवडयात शुक्रवारी कल्याण पुर्वेकडील हाजीमलंग रोडवर असलेल्या मोनालिसा बारमध्ये टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला वेटर विनामास्क होत्या तसेच तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना आढळुन आल्या होत्या. या कारवाईत बारचालक, मॅनेजर, वेटर महिला व ग्राहक अशा 56 जणांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा एकदा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने लोटस बारवर धाड टाकून त्याठिकाणी सुरू असलेल्या अश्लील हावभाव आणि कृत्याचा पर्दाफाश केला आहे. हे दोन्ही बार मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. परंतू त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या 'धिंगाण्या'कडे मानपाडा पोलिसांचा होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या कार्यपध्दतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :raidधाडdombivaliडोंबिवलीthaneठाणेPoliceपोलिस