शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

NRI पतीने हनीमूनवर बनवला पत्नीचा अश्लील व्हिडीओ, कंटाळून महिलेने उचललं हे धक्कादायक पाउल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 09:33 IST

Crime News : NRI पतीने पत्नीला हनीमूनला नेऊन तिचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. नंतर तो या व्हिडीओच्या माध्यमातूनच पत्नीला ब्लॅकमेल करत होता आणि हुंड्याची मागणी करत होता.

हरयाणाच्या फरीदाबादमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे एका नवविवाहित पत्नीने पतीच्या असुरी वागण्याला कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केली. जेव्हा संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. NRI पतीने पत्नीला हनीमूनला नेऊन तिचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. नंतर तो या व्हिडीओच्या माध्यमातूनच पत्नीला ब्लॅकमेल करत होता आणि हुंड्याची मागणी करत होता. यालाच कंटाळून नववधूने फाशी घेऊन आत्महत्या केली. 

महिलेचे वडील फरीदाबादच्या सेक्टर २२ मध्ये राहतात. मृत महिलाचे वडील म्हणाले की, १५ मार्च २०२१ ला त्यांची मुलगी मेघाचं येथीलच सेक्टर १५ मध्ये राहणाऱ्या अचलसोबत लग्न झालं होतं. अचल अमेरिकेत राहत होता आणि लग्नानंतर त्याने मुलीलाही अमेरिकेत राहण्याची स्वप्ने दाखवली होती. (हे पण वाचा : लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेवर गँगरेप)

ते म्हणाले की, मोठमोठी स्वप्ने दाखवणाऱ्या पतीने केवळ दीड महिन्यातच आपला खरा रंग दाखवण्यास सुरूवात केली. त्यानंतर पतीच्या या वागण्याला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. आता त्यांची इच्छा आहे की, ज्याप्रकारे त्यांच्या मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली तशीच आरोपीलाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचं नाव मेघा असून १५ मार्च २०२१ ला  अचल केसरिया नावाच्या तरूणासोबत तिचं लग्न झालं होतं. अचल गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत सेटल होता. लग्नावेळी मेघा आणि तिच्या वडिलांना स्वप्ने दाखवण्यात आली होती की, त्यांची मुलगी अमेरिकेत राहील. पण त्यांना याची कल्पना नव्हती की, मेघाच्या पतीचा खरा रंग वेगळाच आहे. (हे पण वाचा : पतीने गर्भवती पत्नीची गोळी झाडून केली हत्या, तुरूंगातून नुकतीच बाहेर आली होती महिला)

लग्नानंतर पती-पत्नी हनीमूनला गेले होते. मात्र, हनीमूनला गेल्यावर जे होणार होतं त्याचा अंदाज मेघाला अजिबात नव्हता. हनीमूनच्या नावावर पतीने पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवला. आणि त्याद्वारे पत्नी मेघाकडे त्याने अमेरिकेत कार आणि घर घेण्यासाठी पैशांची मागणी करू लागला. ही घटना मेघा वडिलांना सांगितली. 

मेघाचे वडील म्हणाले की, याच त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलीने सोमवारी सायंकाळी गळफास लावून घेतला. आता ते मुलीला न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. आरोपीलाही फाशी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. तेच पोलिसांनी सांगितले की, मृत मेघाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी पती, सासू, आणि सासऱ्या विरोाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी