शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्सुकता मुंबई आयुक्तांच्या नियुक्तीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:26 IST

रश्मी शुक्ला यांच्या नावाचीही चर्चा

ठळक मुद्देसंजय बर्वे, परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता : सुबोध जायस्वाल महिनाअखेरीस होणार डीजीपी!लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख संजय बर्वे, अप्पर महासंचालक परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जमीर काझी मुंबई - निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीकडे लागले आहे. येत्या गुरुवारी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी मुंबईचे आयुक्त सुबोध जायस्वाल यांची नियुक्ती निश्चित मानली जाते. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल पोलीस वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख संजय बर्वे, अप्पर महासंचालक परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलीस महासंचालक पडसलगीकर यांना जून, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळल्याने ते २८ फेबु्रवारीला निवृत्त होतील. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या जागी १९८५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी व गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची धुरा सांभाळणाºया जायस्वाल यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. त्यांच्यानंतर होमगार्डचे महासमादेशक संजय पांडे हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. मात्र, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कायद्याच्या चौकटीत काम करणे, राजकीय हस्तक्षेप खपवून न घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे, गेली अनेक वर्षे त्यांना ‘साइड’ पोस्टिंग मिळाली आहे. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन गृहसचिव के. पी. बक्षी यांच्या घरी व कार्यालयात होमगार्डला ड्युटी देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे संतप्त होऊन त्यांची सेवाज्येष्ठता दोन वर्षे नऊ महिन्यांनी कमी (डायस नॉन) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पांडे यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान देत, पदोन्नती मिळविल्याने राज्य सरकारची त्यांच्यावर वक्रदृष्टी आहे. त्यामुळे त्यांचा विचार केला जाणार नसल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतर एसीबीचे प्रमुख संजय बर्वे हे ज्येष्ठ अधिकारी असून, गेल्या अडीच वर्षांपासून त्यांचे नाव या पदाच्या शर्यतीत राहिले आहे. सहा महिन्यांनी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनाच आयुक्तपद दिले जाईल, अशी शक्यता आहे. त्यांच्याशिवाय मुख्यालयातील अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह यांचे नाव चर्चेत आहे.सिंह हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांच्याशिवाय १९८७च्या बॅचचे बिपीन बिहारी (पोलीस गृहनिर्माण व कल्याण निधी), सुरेद्र पांडे ( सुधार सेवा), डी. कनकरत्नम (सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे ( विधि व तंत्रज्ञ) हे ज्येष्ठ आहेत. मात्र, सिंह यांच्या काम करण्याच्या धडाडीमुळे त्यांचेही नाव दोन वर्षांपासून चर्चेत आहे. त्यांची नियुक्ती करायची झाल्यास महासंचालक म्हणून बढती दिली जाईल.

रश्मी शुक्ला यांच्या नावाचीही चर्चा

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, असे असले, तरी सध्या त्यांचा विचार करण्यात येणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

 

 

 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईcommissionerआयुक्त