शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात एमडी तस्कर आबूचा जामीन रद्द,आत्मसमर्पण करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 22:08 IST

 गुन्हे शाखेकडून शोधाशोध 

ठळक मुद्देनागपूर विदर्भासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात आबूचे अमली पदार्थ तस्करीचे मोठे नेटवर्क होते.

नागपूर : मध्यभारतातील कुख्यात एमडी तस्कर फिरोज उर्फ आबू अजीज खान याचा जामीन न्यायालयाने रद्द केला. त्याला आत्मसमर्पण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहे. 

नागपूर विदर्भासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात आबूचे अमली पदार्थ तस्करीचे मोठे नेटवर्क होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नागपूरला ड्रग फ्री सिटी बनविण्याच्या संकल्पनेनुसार गेल्यावर्षी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात आबूचे नेटवर्क तोडले. त्याला आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तो वर्षभर कारागृहात होता. त्याला २९ जूनला जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्याची कारागृहातून सुटका झाली. अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त डॉ. निलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने आबूचा जामीन मंजूर करण्यासाठी कागदोपत्री जोरदार तयारी केली. त्यानंतर न्यायालयात फेरविचार अर्ज सादर केला. त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या २९ गुन्ह्यांचा सविस्तर अहवाल सादर केला. आबू याला मिळालेला जामीन तथ्यांवर आधारित नसल्याचे सांगून त्यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दोन्ही पक्षाचे मत आणि कागदोपत्री पुरावे तपासून फिरोज उर्फ आबू याचा जामीन रद्द करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले. पोलिसांकडे त्याने आत्मसमर्पण करावे, असेही आदेश दिले. न्यायालयात वरिष्ठ पोलिस अधिकारी सार्थक नेहते आणि सरकारी वकील वसंत नरसापूरकर, प्रशांत भांडेकर, लीलाधर शेंद्रे यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. या घडामोडीमुळे अमली पदार्थ तस्करीत गुंतलेल्या यांचे धाबे दणाणले आहेत.

न्यायालयाने मत नोंदविले या प्रकरणात न्यायालयाने आपले मत नोंदविताना 'एखाद्या खटल्यात न्यायालयाने दिलेला निर्णय हा कोणत्याही पक्षाने चुकीच्या पद्धतीने बाजू मांडून न्यायालयाची दिशाभूल करून त्यावर आधारित असेल. तर न्यायालयाने त्याची दखल घेऊन त्यावर पुन्हा निर्णय देण्याचा अधिकार आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले.आमची नजर आहे : राजमानेअबूला न्यायालयाने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहे. तो फरार होऊ नये म्हणून आमची त्याच्यावर नजर आहे, अशी प्रतिक्रिया गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी लोकमत'ला दिली.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूरDrugsअमली पदार्थSmugglingतस्करी