शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
3
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
4
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
7
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
8
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
9
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
10
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
11
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
12
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
13
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
14
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
15
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
16
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
18
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
19
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

कुख्यात गँगस्टर रवी पुजारी पुन्हा ऑर्थर रोड तुरुंगात; नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने सुनावली कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:16 IST

Gangster ravi Pujari : सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू असताना रवी पुजारी याने सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

नाशिक : येथील पथर्डीफाटा येथे सुमारे दहा वर्षांपूर्वी दहा कोटींच्या खंडणी वसुलीसाठी एका बिल्डरच्या कार्यालयात गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गँगस्टर रवी पुजारी यास गुरुवारी (दि.29) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात हजर केले. सुमारे तासाभराच्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी देशमुख यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुजारीला पुन्हा ऑर्थररोड तुरुंगात नेण्यात आले आहे.बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू असताना रवी पुजारी याने सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 'खंडणी न दिल्यास गेम करू..' अशी धमकी संबंधित व्यवसायिकला देण्यात आली होती. त्यानंतर पाथर्डीफाटा येथील एका मोठ्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी उभारलेल्या बिल्डरच्या कार्यालयावर २५ नोव्हेंबर २०११ साली गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये येथील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या गुन्ह्यात  चौघा संशयित आरोपींपैकी तिघा आरोपींना २०१९साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्याचा तपास नंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच फरार पुजारी यास बेड्या ठोकल्या. त्याला गेल्या शुक्रवारी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात मुंबई पोलिसांनी हजर केले होते. न्यायालयाने त्यास सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने पोलिसांनी पुन्हा पुजारी यास आज न्यायालयापुढे उभे केले. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने पुजारी यास 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी

कुख्यात गँगस्टर रखी पुजारी याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी असलेले संबंध व टोळ्यांमधील वैमनस्य लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने रवी पुजारी यास सशस्त्र पोलीस बंदोबस्तात मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगातून नाशिकला आणण्यात आले होते. सकाळी 11 वाजता त्यास न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपताच पुजारी याला कोरोना नमुना चाचणीकरिता नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथून कडेकोट बंदोबस्तात पुन्हा त्यास मुंबईला हलविण्यात आले.'आवाज' तपासण्यासाठी नमुने तज्ज्ञांकडे बांधकाम व्यावसायिकाला पुजारी याने दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग न्यायालयासमोर सादर करून त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी तसेच उर्वरित दोन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने आवाजाचे नमुने तज्ज्ञांकडे पडताळणीसाठी सोपविण्याचे आदेश दिले. दरम्यान, मुंबई गुन्हेशाखेचा या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पुजारीचे या प्रकरणातील फोन कॉल तपासणीसाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तज्ञांकडे रवाना करण्यात आले आहेत.

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीNashikनाशिकArthur Road Jailआर्थररोड कारागृहExtortionखंडणीCourtन्यायालय