शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

संजय पांडे यांना ईडीकडून नोटीस; नुकतेच मुंबई पोलीस आयुक्तपदावरून झाले निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 07:49 IST

२०१० आणि २०१५  च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट दिले

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस बजावली आहे. पांडे यांना मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.  

पांडे हे दोन दिवसांपूर्वीच निवृत्त झाले असताना त्यांना ईडी चौकशीला तोंड द्यावे लागेल. पांडे यांनी २००१ मध्ये एक आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. त्यादरम्यान पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. संबंधित  कंपनीत मुलगा आणि आईला त्यांनी संचालकपदी नेमले. २०१० आणि २०१५  च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट दिले., दरम्यान सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुन्ह्याच्या आधारे ईडीदेखील याप्रकरणी चौकशी करत आहे. 

चित्रा रामकृष्ण आणि योगी प्रकरणाशी संबंध?पांडे यांच्या या फर्मला २०१० ते २०१५ च्या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. याच काळात एनएसईमध्ये को-लोकेशन घोटाळा झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एनएसई को-लोकेशन घोटाळ्यात निवडक ब्रोकरना फायदा करून देण्यात आला होता. सुरुवातीला सीबीआयने एनएसई घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीबीआयने याप्रकरणी गेल्या चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या तपासाच्या आधारे एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि माजी ग्रूप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे, तर पांडे यांच्या फर्ममधील एकाची चौकशी केल्याची माहिती मिळते.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस