शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:49 IST

एका पतीने आपल्या पत्नीवर तब्बल आठवेळा चाकूने हल्ला करत तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना सध्या उघडकीस येत आहेत. अशातच बिहारमध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर तब्बल आठवेळा चाकूने हल्ला करत तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता गंभीर जखमी झालेल्या पत्नीच्या आईने आपल्या जावयाबद्दल मोठा खुलासा केला आहे. क्रूर जावयाच्या तब्बल १२ गर्लफ्रेंड असल्याचा दावा सासूने केला.

बिहारमधील लोभी पतीने आपल्या २७ वर्षीय पत्नी संजुला कुमारीवर चाकूने आठ वेळा हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. आरोपी प्रेमराजचे केवळ एक-दोन नव्हे, तर तब्बल १२ विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तो स्वतः एका सरकारी महामंडळाचा कर्मचारी असूनही जिम उघडण्यासाठी पत्नीकडून ५ लाख रुपयांची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने हे क्रूर कृत्य केले. ही घटना जोगसर पोलीस स्टेशन हद्दीतील कोयलाघाट येथे घडली.

अनैतिक संबंधांमुळे व्हायचे वाद!संजुला आणि प्रेमराज यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्यांना ५ आणि ४ वर्षांची दोन मुले आहेत. प्रेमराजच्या अनेक मुलींशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या घरात नेहमीच वाद होत असत. संजुलाच्या कुटुंबाकडे प्रेमराज आणि त्याच्या १२ मैत्रिणींचे फोटोही आहेत.

गुरुवारी संजुला मुलांना शाळेतून आणायला गेली असताना प्रेमराजने तिला वारंवार फोन करून घरी बोलावले. संजुला घरी पोहोचताच तिची वहिनी ममता कुमारीने तिच्याशी भांडायला सुरुवात केली. त्यानंतर प्रेमराज, त्याचे वडील रामचंद्र यादव आणि आई मुक्ती देवी यांनी संजुलाला एका खोलीत कोंडून प्रथम बेदम मारहाण केली. तिला बेडवर झोपवून गळा दाबण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर क्रूर प्रेमराजने संजुलाच्या शरीरावर वेगवेगळ्या भागांत आठ वेळा चाकूने वार केले. 

कुटुंबालाही मारहाण, पोलीस ठाण्यात बेशुद्ध पडली महिला!संजुलाने आपल्या आईला, मंजू देवींना, घटनेची माहिती दिली. मंजू देवी आणि भाऊ युवराज यादव ५ किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या माहेरहून घटनास्थळी पोहोचले असता, संजुलाच्या सासरच्यांनी त्यांनाही मारहाण केली. जखमी अवस्थेत संजुला, तिची आई आणि भाऊ जोगसर पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यानंतर संजुला पोलीस ठाण्यातच बेशुद्ध पडली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिला मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अनैतिक संबंध आणि पैशाची मागणी हेच कारण!युवराज यादवने सांगितले की, प्रेमराजचे अनेक मुलींशी अवैध संबंध आहेत. तो वारंवार ५ लाख रुपयांची मागणी करत होता. मुलांची जबाबदारी कधीही प्रेमराजने घेतली नाही, ती नेहमी संजुलाच पार पाडत असे. संजुलाने तिच्या पतीला अनेक मुलींसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते, असेही युवराजने सांगितले. मंजू देवींच्या म्हणण्यानुसार, प्रेमराजला पुन्हा लग्न करायचे होते आणि तो संजुलाकडून घटस्फोट मागत होता. जिम उघडण्याच्या नावाखाली तो पैशांची मागणी करून मारहाण करत होता.

चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या संजुलाला ऑपरेशन थिएटरजवळ अर्धा तास वेदनेने तडफडत पडून राहावे लागले, कारण तिथे लाईट नव्हती. ऑपरेशन थिएटरमध्येही अंधार होता. या गंभीर घटनेनंतरही रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार