शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीतील मृताची बत्तीस तासांनंतर उत्तरीय तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 07:44 IST

Crime News: चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार धोती याचा पोलीस कोठडीत शनिवारी मृत्यू झाला होता.

आमगाव (जि. गोंदिया) : चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार धोती याचा पोलीस कोठडीत शनिवारी मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल  ३२ तासांनंतर धोती याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी रविवारी  दुपारी १ वाजता गोंदिया येथे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली होती. पथकाने त्यांची चौकशी केल्यानंतर शुक्रवारी पहाटे १ वाजता मृत धोती, सुरेश राऊत व राजकुमार मरकाम या तिघांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या आरोपींना दुसऱ्या दिवशीही आमगाव पोलिसांकडे सोपविता येऊ शकत होते; परंतु गुन्हे शाखेने रात्रीच आरोपींना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन का केले, गुन्हे शाखा पोलिसांनी अटक असलेल्यांना मारहाण केली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.राजकुमार धोती याच्या मृतदेहावर आमगाव येथे उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही. नागरिकांचा आक्रोश पाहता मृतदेह गोंदियाला पाठविण्यात आला. गोंदियातही रविवारी दुपारी १ वाजता उत्तरीय तपासणीला सुरुवात झाली. आमगाव येथील न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासमक्ष गोंदियातील तीन डॉक्टरांच्या चमूने उत्तरीय तपासणी केली व त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चोख बंदोबस्तात आमगावला रवाना करण्यात आला. अंत्यसंस्कार होईपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त हाेता. 

पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिली भेटगडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी आमगाव येथे भेट दिली. यावेळी आमदार सहषराम कोरोटे यांनी त्यांची भेट घेऊन या प्रकरणात दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सीआयडीमार्फत उच्चस्तरीय तपास करावा. मृताच्या कुटुंबीयांना शासन व पोलीस विभागाकडून आर्थिक मदत द्यावी. कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी