शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

50 मुलींना पाहिलं, हेमलताला शॉर्टलिस्ट केलं, 5 हजारांचं आमिष अन्...; मर्डर मिस्ट्रीची इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 10:43 IST

आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पायलने बॉयफ्रेंडसोबत मिळून हा कट रचल्याचं समोर आलं आहे. 

आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सोशल मीडियावर एका तरुणीने तब्बल 50 मुलींचा शोध घेतला आणि त्यातील एकीला जाळ्यात ओढून तिची हत्या केली. तिच्या मृतदेहाला नवी ओळख देऊन घटनेला वेगळाच ट्विस्ट दिल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. श्रद्धा हत्याकांडानंतर आता हेमलता हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. टीव्ही शो पाहून सीरियल किलर व्हायचं असलेल्या पायलने हे सर्व मुद्दाम घडवून आणलं आहे. आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पायलने बॉयफ्रेंडसोबत मिळून हा कट रचल्याचं समोर आलं आहे. 

पायलने यानंतरही अनेक हत्या करण्याचा कट रचला होता मात्र, त्यापूर्वीच ती पकडली गेली. सीरियल किलर बनण्यासाठी तयार असलेल्या पायलने संपूर्ण कट रचण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर टीव्ही सीरियल आणि अनेक क्रिमिनल ड़ॉक्यूमेंटची मदत घेतली होती.  पायलच्या आई-वडिलांनी यावर्षी मे महिन्यात आत्महत्या केली होती. पायलने तिचा चुलत भाऊ सुनील, त्याची पत्नी स्वाती आणि तिच्या काही नातेवाईकांना तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूला जबाबदार मानले. तिला त्याचा बदला घ्यायचा होता. पण त्यांना मारण्याआधी तिच्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून तिने आत्महत्या केल्याचं नाटक केलं.

पायलने तिच्या प्रियकरासह स्वतःच्या मृत्यूचे नाटक रचले आणि तिच्यासारखी दिसणारी मुलगी शोधू लागली. यासाठी दोघांनी सोशल मीडियावर 50 हून अधिक मुली पाहिल्या. त्यानंतर अजयला त्याच्या मित्रामार्फत हेमलताबद्दल माहिती मिळाली आणि या दोघांनी हेमलताला आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिची हत्या केली. सर्वकाही ठीक सुरू होतं. मात्र, 15 नोव्हेंबर रोजी बिसरख पोलीस ठाण्यात 28 वर्षीय हेमलता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी तिचा मोबाईल रहस्यमयी पद्धतीने बंद झाल्याने तिचा पत्ता लागला नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी हेमलताच्या मोबाईल फोनचा सीडीआर काढला. सीडीआर काढताच पोलिसांना या प्रकरणाचा पहिला सुगावा लागला. बेपत्ता होण्यापूर्वी हेमलताचे अजय कुमार नावाच्या तरुणाशी अखेरचे बोलणे झाल्याचे पोलिसांना समजले. म्हणजे आता अजय कुमार पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांनी अजयला अटक करण्यासाठी सापळा रचला आणि 1 डिसेंबर रोजी ग्रेटर नोएडा येथील चार मूर्ती गोलचक्कर येथून केवळ त्यालाच नाही तर पायललाही पकडले. या दोघांच्या अटकेने पायलच्या आत्महत्या हा केवळ एक कट असल्याचं पोलिसांपुढे आलं. 

ज्या मुलीने 15 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती, जिच्यावर कुटुंबीयांनी स्वतःच्या हाताने अंत्यसंस्कार केले होते, ती पोलिसांना जिवंत सापडली आणि त्यामागील जी कहाणी पुढे आली ती ऐकून पोलीसही हैराण झाले. 13 नोव्हेंबरला ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता, तो पायलचा नसून हेमलताचा होता. हत्येनंतर तिचा चेहरा उकळत्या तेलाने जाळण्यात आला होता. एवढेच नाही तर मृतदेहाला पायलचे कपडे घालून पायलच्या नावाने एक सुसाईड नोटही ठेवण्यात आली होती, जेणेकरून मृतदेह पायलचाच आहे असं सर्वांना वाटावं. यामागे पायल आणि तिचा प्रियकर अजय यांचाच हात होता. दोघांनी कट रचून पाच हजार रुपयांचे आमिष दाखवून आधी हेमलताचे अपहरण केले आणि नंतर आपल्या घरी आणून तिची हत्या केली. 

आरोपींना अशा प्रकारे पायलला मृत दाखवायचे होतेच, पण यामागे आणखी अनेक हत्या करण्याचा कट होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलला 'कुबूल है' नावाची मालिका पाहून हत्येची कल्पना सुचली आणि तिने प्रियकरासमोर एक अट घातली की जर त्याने तिच्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तिला साथ दिली तरच ती लग्न करेल. त्यासाठी प्रियकर अजयसह पायलने सुनील आणि इतरांना मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.

पायलची वहिनी आणि आत्याची मुलं तिच्या वडिलांना खूप त्रास देत असत. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली होती. त्यामुळे पायलच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली. पायल आणि तिच्या कुटुंबीयांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्या चार जणांवर गुन्हाही दाखल केला होता. मात्र, त्या लोकांना शिक्षा झाली नाही. याच कारणामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे पायलने सांगितले. तिला सुनील आणि त्या सर्व लोकांना मारायचे होते, ज्यांच्यामुळे तिच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी