शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ज्या नोकराकडे घराच्या देखरेखीसाठी चावी दिली, तोच घरातील ५ कोटींचा माल घेऊन झाला लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 13:03 IST

पोलिसांनी आरोपी नोकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून सध्या ३० लाख ताब्यात घेतले आहेत.

नोएडामध्ये एका मालकाने ज्या नोकराला घर सांभाळण्यासाठी ठेवलं होतं त्यानेच पूर्ण घर साफ केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या तिहार तुरूंगात बंद मालकाने नोएडामधील त्याचं घर आपल्या नोकराकडे देखरेखीसाठी दिलं होतं. या नोकराने त्याच्या काही साथीदारांसोबत मिळून मालकाच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि कारसहीत ५ कोटीचा माल लंपास केला. पोलिसांनी आरोपी नोकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून सध्या ३० लाख ताब्यात घेतले आहेत.

नोएडाचे एडिशनल डीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, '२ मे रोजी रामू थापेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं होतं की, त्याचे मालक पीयूष बन्दोपाध्याय जो फसवणुकीच्या केसमध्ये दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. त्यांनी आपल्या घराची देखरेखची जबाबदारी त्यांचा ड्रायव्हर गयादीन उर्फ गोपालकडे दिली होती'.

मालक तुरूंगात गेल्यावर काही दिवसातच ड्रायव्हर गोपालने साथीदारांसोबत मिळून पीयूषच्या घरातून सियाज कार, एक स्कूटी, घरातील सोन्या-चांदीचे दागिने, आवश्यक कागदपत्रे, २ फ्रीज, २ टीव्ही, सोफा, कारपेट, वॉशिंग मशीन, अनेक एसी आणि इतरही काही वस्तू ट्रकमद्ये भरून फरार झाला. चोरांनी घरात एकही वस्तू ठेवली नाही. चोरी केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ५ कोटी रूपये आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे'. (हे पण वाचा : ‘फोन पे’च्या ऑफरची बतावणी करून दाम्पत्याची आर्थिक फसवणूक)

डीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी नोकर गोपाल याला अटक केली आहे. गोपालची चौकशी केल्यावर पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांनाही मध्यप्रदेशमधून अटक केली. ज्या घरात चोरीची घटना घडली त्या घराचा मालक पीयूष इन्नोवेटिव  आयडियाज नावाने कंपनी चालवत होता आणि परदेशी कंपन्यांना टेक्निकल सपोर्ट अॅडव्हाइस देत होता.

पीयूषला फसवणुकीच्या केसमध्ये २८ ऑगस्ट २०२० मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक करत तिहार तुरूंगात पाठवलं होतं. तुरूंगात जातेवेळी त्याच्या घराची चावी देखरेखीसाठी ड्रायव्हर गयादीन उर्फ गोपालकडे दिली होती. तो सर्व सामानाची देखरेख करत होता. या चोरांकडून ३० लाख रूपये मिळाले आहेत. चाडेचार कोटी मिळणे बाकी आहे.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारीThiefचोर