शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे यांना शुक्रवारपर्यंत अटक करणार नाही; पोलिसांची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 06:31 IST

संतोष परब यांच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले. त्यांच्यावर वार करणाऱ्या हल्लेखोराने ही माहिती गोट्या सावंत व नीतेश राणे यांना द्यायला पाहिजे,  असे कारमध्ये बसत फोनवर कोणाला तरी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी भाजपचे आमदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नीतेश राणे यांना शुक्रवारपर्यंत अटक करणार नाही, असे आश्वासन कणकवली पोलिसांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिले. याप्रकरणी नीतेश राणे हे ‘’मास्टरमाईंड’’ होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी न्या. सी. व्ही. भडंग यांना दिली. 

सकृतदर्शनी नीतेश राणे यांच्याविरोधात पुरावे आहेत. राणे साक्षीदारांवर दबाव टाकत आहेत. कोणीही साक्षीदार जबाब नोंदवण्यासाठी पुढे येत नसल्याची माहिती पासबोला यांनी न्यायालयाला दिली.राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी हे सर्व आरोप फेटाळले. नीतेश राणे पोलीस तपासास सहकार्य करण्यास तयार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने राणे यांनी केलेल्या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कणकवली पोलिसांना दिले. सरकारी वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागताच प्रधान यांनी राणे यांना तोपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती न्यायालयाला केली.

त्यावर कणकवली पोलिसांनी पुढील सुनावणीपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, असे आश्वासन न्यायालयाला दिले. न्यायालयाने ते मान्य करत राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी ठेवली.कणकवली पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यावर राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. परंतु, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने राणे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.

कणकवली पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार संतोष परब यांच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले. त्यांच्यावर वार करणाऱ्या हल्लेखोराने ही माहिती गोट्या सावंत व नीतेश राणे यांना द्यायला पाहिजे,  असे कारमध्ये बसत फोनवर कोणाला तरी सांगितले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे