छत्तीसगडमधील रायपूरमध्ये राहणारा ३१ वर्षीय रवी पुजारी, गेल्या आठ वर्षांपासून फेसबुकवर निशा जिंदल नावाने वावरत होता. १० त्याला फॉलो करत होते. फेसबुकवर गेल्या आठ वर्षांपासून मुलगा असून मुलगी असल्याचे भासवणाऱ्या या तरुणाला पोलिसांनीअटक केली आहे. लोकांना सत्य घटना कळावी म्हणून पोलिस कोठडीत आणताच त्याला पोलिसांनी, मी पोलिस कोठडीत आहे. मीच निशा जिंदल आहे, अशाप्रकारची पोस्टही करायला सांगितली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही आयएएस, आयपीएस अधिकारी देखील त्याला फॉलो करत होते. गेल्या 11 वर्षांपासून अभियांत्रिकेच्या परिक्षेत नापास होणारा ३१ वर्षीय रवी पुजारी गेल्या २०१२ पासून फेसबुकवर निशा जिंदल आणि पाकिस्तानी अभिनेत्री मिराह पाशा नावाने फेक फेसबुक अकाउंट ओपन केले होते. अटक आरोपी रवी निशा जिंदल नावाच्या महिलेच्या नावे फेक फेसबुक अकाउंट करून सातत्याने जातीय संदेश पोस्ट करत असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडे येत होत्या.
निशा जिंदल या फेक फेसबुक आयडीवरुन रवी कधी मोठ्या अधिकाऱ्याप्रमाणे पोस्ट करत असे. तर, कधी मोठ्या संस्थेत उच्च पदावर कार्यरत असल्याचा दावा करायचा. कधी मी आता ३५ वर्षांची झाली असून अजून सिंगल आहे अशाप्रकारच्या पोस्ट पुरुषांना आकर्षित करण्यासाठीही करायचा. सध्या त्याच्या आयडीचे डिटेल्स घेतले जात आहेत. त्याने ब्लॅकमेल करुन पैसे कमावलेत का याचा सध्या तपास करत आहेत.