शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : शरीरावरील दातांच्या खुणा होत्या क्रूरतेच्या साक्षीदार ; 10 फोटोंमधून मिळाले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 12:26 IST

Nirbhaya Case : २० डिसेंबर २०१२ रोजी या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसानंतर तत्कालीन एसआय प्रतिभा शर्मा यांच्या आदेशानुसार छायाचित्रकाराने दातांची दहा मोठी छायाचित्रे घेतली.

ठळक मुद्दे१० पैकी ४ दातांच्या खुणांची ओळख पटविण्यात आली. या दातांच्या जखमांपैकी ३ जखमा राम सिंगच्या (तुरुंगात आत्महत्या केलेला दोषी)  तर १ दातांची खूण अक्षयची असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.दोषींनी पीडित महिला आणि तिच्या मित्राचे कपडे जाळले होते. पोलिसांनी असे अनेक पुरावे गोळा केले की ते दोषींना संपवण्यासाठी पुरेसे होते.

नवी दिल्ली - काल निर्भयाच्या मारेक्यांना फाशी देण्यात आली आहे. वसंत विहार पोलिसांनी कोर्टात आरोपींचे दुष्कर्म सिद्ध करण्यासाठी, पुरावे शोधण्यासाठी दिवस रात्र एक केली होती. निर्भयाच्या अंगावर अनेक दातांनी चावलेल्या जखमा आढळल्या. २० डिसेंबर २०१२ रोजी या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसानंतर तत्कालीन एसआय प्रतिभा शर्मा यांच्या आदेशानुसार छायाचित्रकाराने दातांची दहा मोठी छायाचित्रे घेतली.

कर्नाटकच्या धारवाड पोलिसांनी ही छायाचित्रे एसडीएम कॉलेज ऑफ डेंटल सायन्स येथे पाठविली. यासह पाच आरोपींच्या दातांचे नमुने देखील पाठविण्यात आले होते. फॉरेन्सिक ओंडोन्टोलॉजीच्या तंत्राच्या माध्यमातून आरोपींच्या दातांचे नमुने आणि निर्भयाच्या शरीरावर सापडलेल्या दातांच्या खुणा यांची एकत्रित पडताळणी करण्यात आली.विश्लेषणामध्ये, १० पैकी ४ दातांच्या खुणांची ओळख पटविण्यात आली. या दातांच्या जखमांपैकी ३ जखमा राम सिंगच्या (तुरुंगात आत्महत्या केलेला दोषी)  तर १ दातांची खूण अक्षयची असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या संपूर्ण घटनेत हे दोन्ही पुरावे दोन आरोपींच्या दुष्कर्म उघडकीस आणण्यास पुरेसे होते. निर्भयाच्या शरीरावर वाढलेले दातांच्या खुणा आणि त्यासंबंधित पुरावे गोळा करण्यासाठी वसंत विहार पोलिसांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळेच गुन्हेगारांना फाशीच्या तख्तावर पोचवू शकले.याच आधारावर निर्भयाच्या शरीरावर दाताच्या सापडलेल्या खुणा राम सिंग आणि अक्षय यांच्या दात्यांच्या नमुन्याशी जुळल्या. वसंत विहार पोलीस ठाण्याचे तत्कालीन एसआय विशाल चौधरी यांनी दातांच्या खुनांचे छायाचित्रे घेऊन तज्ज्ञांकडे पोहोचले होते. पोलिसांनी या गोष्टींचा अगदी जवळून अभ्यास करण्यास सुरवात केली होती. परंतु त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकांच्या दबावापासून दूर राहून निःपक्षपाती चौकशी अहवाल तयार करणे हे होते. तपासासाठी दोषींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी डीएनए विश्लेषणही करण्यात आले होते. 

Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

Nirbhaya Case : मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावणार; जाणून घ्या पवन जल्लादचा पगारसामूहिक बलात्काराच्या रात्री गुन्हेगारांनी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये पीडित महिला आणि तिच्या मित्राच्या रक्ताचे डाग सापडले होते. मुख्य आरोपी राम सिंगच्या (त्याने मार्च २०१३ ला तुरुंगात आत्महत्या केली)  चप्पलवरही पीडितेच्या रक्ताचे ठसे सापडले. दोषींनी पीडित महिला आणि तिच्या मित्राचे कपडे जाळले होते. पोलिसांनी असे अनेक पुरावे गोळा केले की ते दोषींना संपवण्यासाठी पुरेसे होते. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपPoliceपोलिस