शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक...! कल्यानमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, मग गळा चिरून केली हत्या; संशयित ताब्यात

By मुरलीधर भवार | Updated: December 1, 2022 13:30 IST

आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एक नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला.

कल्याण - एका नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची गळा चिरून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान मृत पीडिता व संशयित दोघेही फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एक नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत महात्मा फुलेनगर पोलिसाना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अल्पवयीन  मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची  गळाचिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चौकशी दरम्यान ही मुलगी फिरस्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरातील फिरस्त्यांची चौकशी सुरू केली.

चौकशी दरम्यान एका तरुणावर संशय बळावल्याने पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं त्यानेच या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचे गळा चिरून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. हा संशयित तरुण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. दरम्यान पीडित मयत तरुणी  व संशयित म्हणून ताब्यात घेतलेला तरुण हे दोघे फिरस्ता असून  हा  स्टेशन परिसरात राहत होते. दरम्यान पोलिसांनी या मयत पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस