शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:43 IST

नालासोपारा, वालीव, वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात शनिवारी आणि रविवारी अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली.

नालासोपारा  - नालासोपारा, वालीव, वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात शनिवारी आणि रविवारी अमली पदार्थ घेणाऱ्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यात या गर्दुल्ल्यांच्या अनेक तक्रारी येत असून पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सातही पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग वाढवले आहे.शनिवारी संध्याकाळी नायगावच्या चंद्रपाडा येथील मोकळ्या जागेत राम पाल (४२), सातिवली येथील तलावाजवळ भानू बेनबन्सी (२०) आणि धानिवबाग येथील तलावाजवळ कमलेश यादव (३५) हे तिघे अमली पदार्थ घेत असताना त्यांना वालीव पोलिसांनी अटक केली. रविवारी संध्याकाळी नालासोपारा पश्चिमेतील विमल रेसिडेन्सी या बिल्डिंगच्या मागे शुभम ठाकूर (२४) आणि हनुमाननगरच्या मैदानात मुथ्थुक्रिश्न आनंदराज (२४) या दाेघांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली. तर वसई पोलिसांनी कोळीवाडा आणि सुरूच्या बागेत अमली पदार्थ घेणाऱ्या चौघांना रविवारी अटक केली. अहमद पटेल (२२), उस्मान शेख (२१), प्रतीक राठोड (१९) आणि मन्नू खान (२२) हे अमली पदार्थांचे सेवन करताना आढळले. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन जणांना अमली पदार्थ घेताना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अशीच सुरू असून अमली पदार्थमुक्त शहर करायचे असल्याचे नालासाेपारा पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. भंगार गाड्या बनल्या गर्दुल्ल्यांचा अड्डा  वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील शहरांमध्ये अनेक रस्त्यांच्या किनाऱ्यालगत मोठमोठ्या भंगार वाहनांमध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. रात्री याच गाड्यांमध्ये बसून हे गर्दुल्ले नशा करीत असतात. ते रात्रीच्या वेळी लोकांनाही लुटतात. विराेध केल्यास जीवघेणा हल्लाही करत असल्यामुळे त्यांची शहरात दहशत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थVasai Virarवसई विरार