शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
6
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
7
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
8
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
9
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
10
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
11
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
12
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
13
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
14
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
15
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
16
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
17
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
18
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
19
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
20
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!

आचोळे येथे एकाच घरात आढळली साडेनऊ लाखांची वीजचोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 19:38 IST

पालघरच्या भरारी पथकाची कारवाई

ठळक मुद्देचोरीच्या विजेचे साडेनऊ लाख रुपयांचे बिल भरण्याची नोटीस पाटील यांना बजावण्यात आली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महावितरणकडून सुरु आहे. वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरी हा अजामीनपात्र गुन्हा असून तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

कल्याण - वसई-विरार महापालिका हद्दीतील आचोळे येथे एकाच घरात साडेनऊ लाख रुपयांची वीजचोरी आढळून आली आहे. पालघर येथील महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून ही वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधित वीज ग्राहक सुदाम रामचंद्र पाटील यांना चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.महावितरणच्या पालघर भरारी पथकाने १० जानेवारीला आचोळे गाव परिसरातील चिमघर येथे सुदाम रामचंद्र पाटील यांच्या घरातील मीटरची तपासणी केली. वीज खांबावरून आलेली केबल वीज मीटरमधून जोडण्याऐवजी ४ कोअर केबलचा वापर करून घरात विजेचा परस्पर वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले. टॅपिंगच्या माध्यमातून पाटील यांनी ४२ हजार ८१२ युनिट वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर कारवाई सुरु असताना पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी भरारी पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु भरारी पथकाने पोलिसांची मदत घेऊन उर्वरित कार्यवाही पूर्ण केली. चोरीच्या विजेचे साडेनऊ लाख रुपयांचे बिल भरण्याची नोटीस पाटील यांना बजावण्यात आली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महावितरणकडून सुरु आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक दत्तात्रय शिंदे (भापोसे) व उपकार्यकारी संचालक  सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंताविनय सिंह, सहायक अभियंता कुणाल पिंपळे, सहायक दक्षता अधिकारी प्रशांत भोये व विशाखा राजूरकर, कर्मचारी महेश कातखेडे यांनी ही कारवाई केली. वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरी हा अजामीनपात्र गुन्हा असून तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :electricityवीजRobberyचोरीkalyanकल्याणpalgharपालघर