शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

नीलेश वाडकर खून प्रकरण : टोळीप्रमुख चॉकलेट सुन्यासह १९ जणांवर मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:03 IST

जनता वसाहत येथील नीलेश वाडकर खून प्रकरणातील टोळीप्रमुख सुनील ऊर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे (वय २२, रा. घोरपडे पेठ) याच्यासह १९ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आलेला आहे.

पुणे  - जनता वसाहत येथील नीलेश वाडकर खून प्रकरणातील टोळीप्रमुख सुनील ऊर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे (वय २२, रा. घोरपडे पेठ) याच्यासह १९ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आलेला आहे.चॉकलेट, नवनाथ बाळासाहेब वाल्हेकर, योगेश राजेंद्र जांभळे, अभिजित गणेश कडू, नितीन ऊर्फ मेट्या अंकुश मेटकरी, अतिष सतीश माळी, प्रकाश ऊर्फ पप्पू अरुण गायकवाड, सौरव रावसाहेब आढाव, राजेश रावसाहेब आढाव, अक्षय हरिभाऊ आंबवले, सूरज ऊर्फ सुरज्या बबन कोळगे, अभिजित राम कदम, भीमराज राजू कांबळे, समीर राऊत नाटेकर, अविनाश ऊर्फ गौरव सुनील देवकुळे, शुभम एकनाथ खाडे, सतीश शाम माळी, योगेश ऊर्फ नुन्या शशिकांत पवार आणि दीपक शेंडी ऊर्फ दीपक दत्तात्रय खिरीड अशी मोक्का लावलेल्यांची नावे आहेत.जनता वसाहतीत वर्चस्ववादातून चॉकलेट सुन्या व त्याच्या साथीदारांनी नीलेश वाडकर याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता़ तर, अमोल कदम, गणेश जाधव आणि सुजित बंडवे यांना गंभीर जखमी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता़ या सर्वांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे़टोळीप्रमुख चॉकलेट सुन्या आणि साथीदार दहशत, हिंसाचाराचा अवलंब, करून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी गंभीर दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे करतात.दत्तवाडी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार केला़ अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे