शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या कारवाईबाबत निलांबरीचे रहिवाशी अनभिज्ञच; ‘त्या’ ११ सदनिकांची माहितीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 21:14 IST

Ed Action :जप्त केलेली मालमत्ता ६.४५ कोटींची आहे. यामध्ये नीलांबरीमधील ११ सदनिकांचा समावेश आहे. 

ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांशी निगडीत असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील निलांबरी प्रोजेक्टच्या ११ सदनिकांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सील ठोकल्याचे जाहीर केले. मात्र या कारवाईबाबत इमारतीमधील रहिवाशी अनभिज्ञच होते. शिवाय, या ११ सदनिकांना संबंधित ईडीचे कोणतेही सील लागले नसल्याने ही कागदोपत्री कारवाई असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर इडीने ही कारवाई केली. जप्त केलेली मालमत्ता ६.४५ कोटींची आहे. यामध्ये नीलांबरीमधील ११ सदनिकांचा समावेश आहे. 

या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहे. याच इमारतीमध्ये २४ व्या मजल्यावर श्रीधर पाटणकर यांचे कार्यालय आहे. ही इमारत पाटणकर आणि जोशी या दोघांच्या संयुक्त मालकीची असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. म्हाडाच्या पुनर्विकास योजनेतून तिचे बांधकाम झाले. २०१५ मध्ये इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर २०२१ मध्ये तिचे काम पूर्ण झाले. गेल्या सहा महिन्यांपासून रहिवाशांना ताबा देण्यास सुरु वात झाली आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त

कारवाई ठाकरे सरकारला हादरा देणारी!ईडीने कागदोपत्री ही कारवाई केलेली असल्यामुळे याठिकाणी मंगळवारी सायंकाळी कारवाई करणारे अधिकारी पोहचले नव्हते. सदनिका सील करण्याच्या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल, त्यावेळी हे अधिकारी घटनास्थळी दाखल होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई ठाकरे सरकारला हादरा देणारी ठरली आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणे